कोरोनावर प्रभावी औषध नसल्याने कोरोनाबरोबरच जगावं लागणार:पालकमंत्री

 

कोल्हापूर:कोरोनावर अद्यापही प्रभावी औषध नसल्याने कोरोना बरोबरच जगावं लागणार आहे, त्यामुळ लोकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना योग्य खबरदारी घेवून स्वच्छता बाळगावी. असं आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलय. ते सॅनिटायझर मशीन वाटप कार्यक्रमात बोलत होते. जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी बसविण्यासाठी ५०० हँड सॅनिटायझर मशीन जिल्हा कॉंग्रेसच्यावतीन देण्यात आली आहेत. देशात प्रथमच असा उपक्रम कोल्हापुर जिल्हा कॉंग्रेस कमिटीने राबविल्याचही त्यांनी म्हंटलय. कोल्हापूर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीन सार्वजनिक ठिकाणी बसविण्याकरीता ऑटोमॅटिक हँड सॅनिटायझर मशीन देण्यात आलीय. त्याचा वाटपाचा कार्यक्रम पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आज कॉंग्रेस कमिटी कार्यालयात संपन्न झाला. यावेळी महापौर निलोफर आजरेकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजू आवळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील यांनी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली तीन महिने जिल्हा कॉंग्रेस सक्रिय काम करत असल्याच सांगिलत. परप्रांतीयाना त्यांच्या गावी सोडण्यासाठीचा खर्च कॉंग्रेस पक्ष करणार होता. मात्र महाविकास आघाडी सरकारने पर प्रांतीयांच्या रेल्वेचा खर्च करण्याचा निर्णय घेतला. परिणामी जो खर्च रेल्वेच्या प्रवासावर करावा लागणार होता, तोच खर्च परप्रांतीय लोकाना जेवण देण्यासाठी करण्याचा निर्णय जिल्हा कॉंग्रेसने घेतला. त्यानुसार या पर प्रांतीय मजुरांना जेवणासह त्यांना , सुके खाद्यपदार्थ आणि लहान मुलांना बाटली बंद दूध दिल्याचही पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितल. रेल्वेने जाणाऱ्या 36 हजार परप्रांतीय लोकांच्या जेवणाची व्यवस्था जिल्हा काँग्रेसने केल्याचही यावेळी नामदार सतेज पाटील यांनी नमूद केल. त्यामुळ कोरोना सारख्या संकट काळात कॉंग्रेस पक्ष म्हणून जे काही करता येईल ते सर्व काही प्रामाणिक पणे केल्याचही त्यांनी सांगितल. हँड सॅनिटायझर मशीन जिल्हा कॉंग्रेसच्यावतीन देण्यात आल्याचा उपक्रम हा देशातील प्रथमच कोल्हापूर जिल्हा कॉंग्रेसने राबविल्याचही पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी सांगित. इचलकरंजी नगरपालिकेचे नगरसेवक शशांक बावचकर यांनी यापूर्वीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या तुलनेत, केवळ घोषणा न करता नामदार सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील अनेक प्रश्न मार्गी लावली आहेत. जिल्हा कॉंग्रेसला साजेस काम त्यांनी केल असून, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अभिनंदनाचा ठरावही यावेळी त्यांनी मांडला. यावेळी औपचारिक म्हणून महिल्या टप्यात १०० हँड सॅनिटायझर मशीन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते देण्यात आलीय. ही मशीन्स पहिल्या टप्यात प्रामुख्याने सर्व सरकारी कार्यालये, एस टी स्टँड, बाजार पेठेमधील मुख्य ठिकाणी बसविण्यात येणार आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते अनुप पाटील यांनी अत्यंत माफक दरात ही हँड सॅनिटायझर मशीन उपलब्ध करून दिल्याने त्याचंही यावेळी विशेष आभार मानण्यात आलं. या कार्यक्रमावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, उपमहापौर संजय मोहिते, गुलाबराव घोरपडे, बाळासाहेब सरनाईक, नगरसेवक तौफीक मुल्लाणी, कॉंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळोखे, महिला शहराध्यक्षा संध्या घोटणे, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, किसन कुऱ्हाडे, संजय पोवार वाईकर त्याचबरोबर कॉंग्रेसचे सर्व तालूकाध्यक्ष विविध सेलचे पदाधिकारी, नगरसेवक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!