गुन्हे शोधण्यासाठी सी.सी.टी.व्ही कॅमेरे उपयोगी पडणार:डी.वाय.एस.पी प्रशांत अमृतकर

 

कोल्हापूर/प्रतिनिधी :कोरगांवकर पेट्रोल पंप व कोरगावकर ट्रस्टच्या मार्फत अत्याधुनिक असे 3 सीसीटीव्ही कॅमेरे पेट्रोल पंपाच्या शेजारी असणाऱ्या चौकांमध्ये बसविण्यात आले आहेत. अतिशय गजबजलेला चौक एमआयडिसी,नागाव, हेरले, हलोंडी, सांगली-कोल्हापूर आदी ठिकाणी ये जा करणाऱ्या मार्गावर जोडणाऱ्या चौकात हे तीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.हे कॅमेरे गुन्हे शोधण्यासाठी उपयोगी पडणार आहेत.कोरगावकर कुटुंबियांचे काम अतिशय चांगले असल्याचे श्री अमृतकर यांनी उदघाटन प्रसंगी बोलून दाखविले.कोरगावकर ट्रस्टच्या या उपक्रमामुळे गुन्हेगारीला बऱ्यापैकी आळा बसणार आहे असेही अमृतकर म्हणाले या उपक्रमाचे उद्घाटन आज  करवीरचे पोलिस डी.वाय. एस. पी प्रशांत अमृतकर यांच्या हस्ते करण्यात आले.या उपक्रमाची माहिती कोरगावकर ट्रस्टचे अध्यक्ष अमोल कोरगावकर यांनी दिली यावेळी एमआयडीसीचे पोलिस स्टेशनचे अधिकारी व विविध मान्यवर तसेच आकाश कोरगावकर,अनिकेत कोरगावकर,आशिष कोरगावकर, राज कोरगावकर, ओम कोरगावकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!