
कोल्हापूर : कोरोना व्हायरस मुळे भारताचे अतोनात नुकसान झाले आहे. कोरोना ही चीनची उत्पत्ती आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था उध्वस्थ झाली आहे. बाजारात मंदीचे सावट आहे. देश संकटात असताना सरकारच्या मदतीला देशातील उद्योजक धावून आले आहेत. त्यातच चीन सीमेवर भारतावर कुरघोडी करू पहातय, त्यामुळे चीनची मस्ती जिरवण्यासाठी प्रत्त्येक भारतीयांमध्ये असून, भारत देशवासीयांनी चीनी वस्तूवर बहिष्कार टाकून, स्वदेशी वस्तूंचा वापर करावा, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले.
जगाला कोरोना व्हायरसमुळे त्रस्त करणाऱ्या आणि जगात चीनी हुकुमशाही गाजवू पाहणाऱ्या चीनच्या अर्थव्यवस्थेला निशाणा करून चीनची अर्थव्यवस्था दुबळी करण्याची ताकद भारतीयांच्यात आहे. चीन जाणूनबुजून खुरापती करत असून,त्याला भारतीय सैन्याने जशास तसे उत्तर दिले आहे. त्यामुळे देशवासियांच्यात चीन विरोधात खदखद निर्माण झाली आहे. ही खदखद सर्वसामान्यांनी दाखवून चीनी मालावर बहिष्कार टाकावा, असे आवाहन करीत आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेना आणि कोल्हापूर जिल्हा व्यापारी महासंघाकडून चीनच्या मालाची होळी करण्यात आली. यावेळी “भारत माता कि जय”, “चीन सरकार हाय हाय”, “चीनी ड्रॅगनच करायचं काय, खाली डोक वर पाय”, “बंद करा.. बंद करा.. चीनी वस्तूंचा वापर बंद करा” “स्वदेशी वापरा, देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.यावेळी विष्णुपंत पोवार, सुभाष पाटील, अल्लाउद्दिन नाकाडे, युवासेनेचे योगेश चौगुले, विश्वदीप साळोखे, पियुष चव्हाण, शैलेश साळोखे, दादू शिंदे, अक्षय कुंभार, शिवतेज सावंत, सौरभ कुलकर्णी, कपिल केसरकर, विशाल पाटील, राज अर्जुनिकर, किरण पाटील, संतोष रेवणकर आदी शिवसेना, युवासेना व व्यापारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply