पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले यांना राष्ट्रीयस्तरीय “कोरोना योद्धा समाजरक्षक पुरस्कार जाहिर

 

कोल्हापूर:गेल्या अडीच महिन्यापासून कोरोना विरुद्ध संपूर्ण भारत लढाई लढत आहे. कोरोना या आपत्तीमुळे व लॉकडाऊनमुळे जे लोक अडकले आहेत,त्या लोकांच्यासाठी ही संस्था रात्रंदिवस राबत आहे. किसान मजदूर संघटनेचे राज्यउपाध्यक्ष व स्टार टी व्ही 9 चे पश्चिम महाराष्ट्र संपादक,समाजसेवक सुनिल भोसले यांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळे ऑल इंडिया इनस्टीट्यूट ऑफ पब्लीक अँन्ड फिजीकल हेल्थ सायन्स यांनी त्यांना कोरोना योद्धा हा सामाजिक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला आहे.देशपातळीवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रात काम केलेल्या मान्यवराना हा पुरस्कार या संस्थेचे संचालक डॉ. के .डी. आर्य व डॉ.अंजू भंडारी यांनी जाहीर केला.आपल्या भावना व्यक्त करताना सुनिल भोसले म्हणाले,”माझे प्रेरणास्थान माझे आईवडील,भाऊ वहिनी,व आमचे संपादक रूपेश निमसरकार असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कार्याची दखल घेवून मला हा पुरस्कार बहाल करून सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा दिल्याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे.तसेच माझ्या या यशामध्ये मला मोलाची साथ देणारे सर्व पदाधिकारी यांचा देखील ऋणी आहे” अशी आपली भावना सुनिल भोसले यांनी व्यक्त केली.सुनिल भोसले यांना पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांना शाहिद हाशमी राष्ट्रीय उपाध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भूमी जनशक्ती किसान मजदूर संघटना, महाराष्ट्र राज्य उपसचिव सौ रोहीणी भोसले,संपादक रूपेश निमसरकार ,महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनचे पश्चिम महाराष्ट्र सह संपर्क प्रमुख सुभाष भोसले ,देशातील अनेक पत्रकार बंधू भगिनी,विविध संघटनेचे पदाधिकारी,मित्र नातेवाईक यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!