सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याकडून दहा हजार टन गाळपसह, एक लाख लिटर इथेनॉल निर्मिती

 

सेनापती कापशी:सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याकडून गणेशोत्सवासाठी पन्नास रुपयांचा हप्ता जमा करणार असल्याची माहिती, अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी दिली. पुढील गळीत हंगामापासून दहा हजार टन गाळप क्षमतेसह, एक लाख लिटर इथेनॉल निर्मिती व ५० मेगावॅट क्षमतेचा कोजन विस्तारणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.नव्याने रुजू झालेल्या जनरल मॅनेजर संजय श्यामराव घाटगे रा. मुरगुड यांच्या स्वागत कार्यक्रमात ते बोलत होते. कारखान्याचे संस्थापक व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते श्री घाटगे यांचे स्वागत झाले.यावेळी बोलताना नवीद मुश्रीफ पुढे म्हणाले, सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याने गेल्या सहा हंगामामध्ये अतिशय उत्कृष्ट गळीत करून ऊस उत्पादकांचा विश्वास संपादन केलेला आहे. कारखान्याची या हंगामाची सगळी एफआरपी दोन महिन्यांपूर्वी 100% देऊन झाली आहे. परंतु गेल्या हंगामामध्ये उसाच्या उपलब्धतेसाठी शंभर रुपये जादा देण्याचे अभिवचन आम्ही दिलं होत. पन्नास रुपये गणपती उत्सवाच्या काळामध्ये आणि पन्नास रुपये दसरा आणि दिवाळी या दोन सणाच्या मध्ये देण्याचं आम्ही दिलेले आश्वासन गणपती उत्सवाला पन्नास रुपये देऊन पूर्ण करत आहोत आणि राहिलेले 50 रुपये हे दसरा आणि दिवाळीच्या दरम्यान देणार आहोत.गेल्या हंगामात संस्थापक व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दूरदृष्टीतून कारखान्याने शेतकऱ्यांच्या माध्यमातून हारवेस्टर मशीन खरेदीला प्रोत्साहन दिले. कारखान्याच्या या निर्णयावरही टीका होत होती. परंतु मराठवाड्यात वाढलेले उसाचे उत्पादन व त्यामुळे ईकडे होणारी मजुरांची टंचाई या पार्श्वभूमीवर हा निर्णय किती योग्य होता, हे काळाच्या कसोटीवर सिद्ध होईल.गेल्या सहा हंगामामध्ये कारखान्याने उत्कृष्ट काम केलं, आता सातवा हंगाम सुरू होत आहे. या सातव्या हंगामामध्ये नऊ लाख मॅट्रिक टन गाळप व्हावं,जास्तीत जास्त इथेनॉल निर्मिती व कोजन निर्मिती व्हावी अशी अपेक्षा कारखान्याचे संस्थापक नामदार मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे.जनरल मॅनेजर महेश जोशी यांनी सात वर्ष कारखान्याची चांगली सेवा केली. त्यांना गावालगत दुसरा कारखाना झाल्यामुळे ते दुसऱ्या कारखान्यांमध्ये रुजू होत आहेत. त्यांच्या जागी संजय शामराव घाडगे हे मूळचे मुरगुडचे सुपुत्र मुख्य जनरल मॅनेजरपदी निवड होत आहे. त्यांचे मनापासून स्वागत करून त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व खातेप्रमुख आणि चांगलं काम करावं आणि जे उद्दिष्ट संस्थापकांनी दिलेला आहे, ते पूर्ण करावं अशी अपेक्षा कारखान्याचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!