
कागल:पुण्याच्या नंदादीप प्रतिष्ठानकडून कोल्हापूर जिल्ह्यातील बारा- बलुतेदारांना धान्य वाटप केले जाणार आहे .या उपक्रमाचा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कागल मधून प्रारंभ झाला . लॉकडाऊनमुळे समाजातील बारा -बलुतेदार ज्यांचे हातावर पोट आहे, अशा गरजूना हे धान्य वाटप केले जाणार आहे.याबाबत अधिक माहिती अशी ,पुणे येथील नंदादीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. निता ढमाले यांच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील गरजु लोकांना तसेच हातावरचे पोट असणाऱ्या बाराबलुतेदार समाज, या सर्व घटकांना माणुसिकीच्या नात्यातुन पुण्यातुन ही मदत पाठविली आहे. याचा शुभारंभ कगल येथे राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते पार पडला.यावेळी मावळा कोल्हापूरचे अध्यक्ष उमेश पोवार, नंदादीप प्रतिष्ठानकडुन शंभूराजे ढवळे, पैगंबर शेख, शरद कोळेकर, राहुल खोत, मावळाचे विनोद साळोखे, व इतर उपस्थित होते
Leave a Reply