इचलकरंजी कोविड सेंटरसाठी केमिस्ट असोसिएशनतर्फे प्लस ऑक्झिमीटर उपकरण प्रदान

 

इचलकरंजी:कोविड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.संसर्ग झालेला रूग्ण तातडीने ओळखणे आवश्यक आहे. यासाठी प्लस आॅक्झिमीटर हे उपकरण महत्त्वाचे आहे.या उपकरणाची गरज ओळखून आज इचलकरंजी केमिस्ट असोसिएशनतर्फे सदर उपकरण उपलब्ध करून प्रांताधिकारी डाॅ. विकास खरात यांच्याकडे मुख्याधिकारी संतोष खांडेकर व वैद्यकीय अधिकारी डाॅ.संग्गेनवार यांच्या उपस्थितीत सुपुर्द करण्यात आले.
यावेळी रविंद्र पाटील,कुमार बोरगावे,संतोष पाटील,विजय तेरदाळे,संजय कोले,शहाजी राणे व संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
प्लस ऑक्झिमीटर हे वैद्यकीय उपकरण कोरोना संशयित रूग्णाची चाचणी तात्काळ घेण्यास मदत करते.त्यामुळे डाॅक्टर व पेशंट याचा वेळ वाचतो,इचलकरंजी केमिस्ट असोसिएशनतर्फे कोविड सेंटरला कायम मदतीचा हात असतो,आता सदर उपकरणे उपलब्ध करून असोसिएशनच्या सदस्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत कौतुकास्पद कार्य केल्याचे नमूद मनोगतात प्रांताधिकारी श्री.खरात यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक रविंद्र पाटील यांनी केले तर
उपस्थितांचे आभार कुमार बोरगावे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!