
कोल्हापूर:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कष्टकरी फेरीवाल्यांचे जीवन धोक्यात येऊ नये म्हणून आज सकाळी पतित पावन संघटनेच्या वतीने आज श्री महालक्ष्मी फेरीवाला संघटना यांना फेरीवाल्यांसाठी अर्सनिक अल्बम औषधी गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले.यावेळी सदर औषध पतित पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील यांच्यावतीने महालक्ष्मी फेरीवाला संघटनेचे अविनाश उरसाल यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले.सदर उपक्रमास डॉ. मिना खंडेलवाल यांनी औषध उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.याप्रसंगी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) भक्त समितीचे अध्यक्ष महेश उरसाल , राजेंद्र सूर्यवंशी ,पतित पावन संघटनेचे विशाल पाटील ,अमोल पाटील ,शिवसेना अवजड वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील , सौ दिपाली शिंदे, महालक्ष्मी फेरीवाला संघटनेचे बजरंग फडतारे , राजू कालेकर ,संजय कोचरेकर आदी प्रमुख उपस्थित होते.
Leave a Reply