
सध्या टेलिव्हिजन मालिकांचे शूटिंग ठप्प असल्यामुळे प्रेक्षक त्यांच्या आवडत्या जुन्या मालिकांचे पुन:प्रसारण पाहण्याचा आनंद घेत आहेत. चाहत्यांना आनंदित ठेवण्यासह त्यांचे मनोरंजन करण्याच्या प्रयत्नामध्ये सोनी सबने त्यांची अत्यंत लोकप्रिय काल्पनिक मालिका ‘बडी दूर से आये है’ पुन्हा एकदा सादर करत प्रेक्षकांना आनंदित केले. या मालिकेमध्ये अत्यंत प्रतिभावान अभिनेता सुमीत राघवन प्रमुख भूमिकेत आहे. मालिकेची कथा घोटाले कुटुंबाच्या अवतीभोवती फिरते. या कुटुंबामधील सदस्य एलियन्स असून ते त्यांच्या हरवलेल्या मुलाच्या शोधासाठी पृथ्वीवर आलेले आहेत. मालिका प्रसारित झाली तेव्हा अनेकांना आवडली होती आणि आता देखील प्रेक्षक या मालिकेचे पुन:प्रसारण पाहण्याचा आनंद घेत आहेत. ‘बडी दूर से आये है’ला मिळालेले यश आणि या अनोख्या मालिकेचा भाग असण्याच्या अनुभवाबाबत बोलताना सुमीत राघवनने काही संस्मरणीय आठवणींबाबत सांगितले.
सुमीत म्हणाला, ”मला सुरूवातीला ‘बडी दूर से आये है’साठी विचारण्यात आले तेव्हा दोन गोष्टी माझ्यासाठी हिताच्या ठरल्या. पहिली गोष्ट म्हणजे प्रॉडक्शन हाऊस हॅट्सऑफ, मी पूर्वी जेडी मजेठिया व आतिषसोबत काम केले होते आणि मी त्यांना चांगला ओळखत होतो. दुसरी गोष्ट म्हणजे चॅनेल सोनी सब – ते माझ्यासाठी दुस-या घरासारखे आहे. म्हणून मी मालिकेमध्ये काम करण्यास होकार देण्यासाठी अधिक विचार केला नाही.”
या मालिकेच्या संकल्पनेबाबत बोलताना सुमीत म्हणाला, ”माझ्यासाठी लेखन ही महत्त्वाची गोष्ट आहे. लेखन कोणत्याही कथेचा गाभा असतो. पटकथा उत्तम असेल तर अर्धे युद्ध जिंकल्यासारखे असते. म्हणून मी आधी पटकथा व कथांकडे पाहतो. ‘बडी दूर से आये है’ची संकल्पना अत्यंत अनोखी होती आणि शेवटी मालिकेला मिळालेल्या यशामधून ते दिसून आले. मालिकेमध्ये काल्पनिक घटकांचा समावेश होता आणि माझी भूमिका खूपच निरागस होती, जी मला खूप आवडली. मालिकेतील कुटुंब वेगळ्या ग्रहामधून आले असल्यामुळे त्यांना कशाप्रकारे स्थितीचा सामना करावा लागेल, हे माहित नव्हते. आमच्या मालिकेला त्यावेळी यश मिळेल की नाही याबाबत शंका होती. पण आम्ही खूप मौजमजा केली. आम्हा सर्वांना माहित होते की, आतिष हा सर्वोत्तम लेखक असण्यासोबत तो पात्रांमध्ये अद्वितीयतेची व विलक्षण कृत्यांची भर करतो. ज्यामुळे पात्रांचे महत्त्व वाढते आणि कलाकारांना देखील भूमिका साकारणे सोपे जाते. सोबतच मालिकेची संपूर्ण टीम, एलियन कुटुंबासोबत मालिकेमधील इतर व्यक्ती सर्वोत्तम होते आणि आतिषने प्रत्येक पात्राला वेगळी विलक्षणता दिली होती, ज्यामुळे सर्व विलक्षण गोष्टींमध्ये अधिक भर झाली. ही एक अनोखी विनोदी मालिका होती.”
तो पुढे म्हणाला, ”ही मालिका माझ्या मुलांच्या मित्रांमध्ये खूपच लोकप्रिय होती. त्यांनी या मालिकेची संकल्पना, तसेच कन्टेन्टचा मनसोक्त आनंद घेतला. ६ वर्षांनंतर देखील प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असलेल्या अशा मालिकेचा भाग असण्याचा खूप आनंद होत आहे.”
मालिकेचे पुन:प्रसारण पाहताना सुमीत गतकाळातील दिवसांना उजाळा देत आहे, ज्यामधून त्याला सोनी सबवरील मालिका ‘बडी दूर से आये है’च्या सेटवर सर्व कलाकारांसोबत केलेल्या मौजमजेची आठवण येत आहे.
Leave a Reply