
कसबा सांगाव:सुळकुड ता. कागल येथील दूधगंगा नदीवरील नव्या पुलाचा लोकार्पण सोहळा उत्साहात झाला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, सरपंच सौ. जयश्री अरुण पाटील -पोवाडे आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या सर्व मान्यवरांनी गाडीत बसून पुलावरून पहिला प्रवास केला व लोकार्पण केले.एकूण १२० मीटर लांबीचा हा पूल सहा कोटी रूपये निधी खर्चून बांधला आहे. २५ फूट रुंदी आहे.यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, पावसाळ्यात सुळकुड हमको ला अंदमान निकोबार बेटासारखे स्वरूप यायचे. सर्व बाजूंनी या गावाचा संपर्क तुटायचा. गेल्या पाच वर्षात विरोधी आमदार असल्यामुळे म्हणावा तितका निधी मिळाला नाही. गेल्या वर्षी तर या गावाने ‘आम्हाला कर्नाटकात घाला’, अशी मागणी केली होती. दरम्यान, या पुलामुळे गाव महाराष्ट्राशी बारमाही संपर्कात राहील. त्यामुळे गावकरी आनंदित झाले आहेत. तसेच गावाला जोडणारे कसबा सांगाव, कोगनोळी, कुन्नूर , आडी -बेनाडी आणि हंचनाळ हे पाचही रस्ते दर्जेदार बनवू.
Leave a Reply