
दुबई : दुबईस्थित अल अदील ट्रेडिंग कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी आखाती प्रदेशातील अब्जाधीश भारतीयांच्या यादीत आठव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.अरेबियन बिझनेस या जागतिक ख्यातीच्या माध्यमगृहाने वर्ष २०२० साठीची ही यादी द इंडियन बिलीयनर्स क्लब या शीर्षकाखाली नुकतीच प्रसिद्ध केली. केवळ वर्षभरात त्यांनी व्यवसायाची प्रगती व विस्तार परिश्रमपूर्वक घडवत आखाती प्रदेशातील आघाडीच्या दहा अब्जाधीश भारतीयांमध्ये स्थान मिळवले आहे. दुबईच्या शासकांनी धनंजय दातार यांना मसालाकिंग बहुमानाने संबोधून त्यांच्या परिश्रम आणि कर्तृत्वाचा यथोचित गौरव केला आहे. अनेक भारतीय लोक आखाती देशांमध्ये अडकून पडले असून मायदेशी परतण्यासाठी आतुर आहेत. अशा गरजू भारतीयांच्या मदतीसाठी डॉ. दातार यांनी आतापर्यंत तीन हजारांहून अधिक भारतीयांना परतीच्या प्रवासाचे मोफत विमान तिकीट आणि अनिवार्य वैद्यकीय चाचणीचा खर्चही उचलला आहे.
Leave a Reply