
कोल्हापूर:रकोल्हापूर व सांगली जिल्हा सीमा बंद केल्यामुळे नोकरदार मजूर व शेतकरी यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. आधीच लाॅक डाऊन मुळे नागरिक हैराण झाले आहेत. शेतकरी व्यवसायिक नोकरदारांना कोल्हापूर जिल्ह्यातून सांगली कडे जाण्यास प्रशासनाकडून मज्जाव केला जात आहे. सध्या शेतीची पेरणी व मशागतीची कामे सुरू आहेत यासाठी शेतकऱ्यांना बी बियाणे खते शेती अवजारे यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सांगलीला जावे लागते व सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोल्हापूर जिल्ह्यात यावे लागते.दोन्ही जिल्ह्यातील गरीब रोजंदारीवर काम करणारे नोकर वर्ग यांना तर तुम्ही कामावर हजर व्हा अन्यथा कामावरून कमी करू अशा नोटिसा दिलेल्या आहेत.पण लाॅक डाऊन मुळे सदर कर्मचाऱ्यांना सांगली जिल्ह्यात जाता येत नाही ही बाब लक्षात घेऊन माजी आमदार उल्हास दादा पाटील यांनी दोन्ही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांना भेट देऊन त्यातून मार्ग काढणे बाबत विनंती केली. पण यातून काही मार्ग निघाला नाही. शेवटी उल्हासदादा यांनी प्रा. डॉ. एन डी पाटील यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेऊन सदर परिस्थितीबाबत सविस्तर माहिती दिली.एन डी पाटील यांनी स्वतः कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना फोन करून यातून मार्ग काढणे बाबत विनंती केली. एन.डी. पाटीलसाहेब यांच्या विनंतीस मान देऊन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मुंबई येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून नोकरदार शेतकरी मजूर व व्यवसायिक यांना मासिक पास देण्याचे मान्य केले.यावेळी कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील -किणीकर सचिव मारुती पाटील आदी उपस्थित होते
Leave a Reply