
कोल्हापूर : कोरोना महामारीचे संकट असताना शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या विनंतीनुसार कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे अत्याधुनिक साधन सामुग्रीसह सुसज्ज स्वतंत्र “कोरोना वॉर्ड” क्रॉम क्लिनिकल रिसर्च अँड मेडिकल टुरिझम प्रा.लि. या कंपनीतर्फे तयार करण्यात आला आहे. शिवसेनेचा उद्या दि.१९ जून रोजी ५४ वा वर्धापनदिन साजरा होत असून, याचे औचित्य साधून या स्वतंत्र कोरोना वॉर्डचा लोकार्पण सोहळा शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे “छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे पार पडणार आहे.या कोरोनाला कायमचे हद्दपार करण्यासाठी आणि राज्य शासनाच्या कामास बळकटी देण्यासाठी सामाजिक भावनेतून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष यांच्या विनंती नुसार सुप्रसिद्ध डॉ.धनंजय लाड यांच्या क्रॉम क्लिनिकल रिसर्च अँड मेडिकल टुरिझम प्रा.लि. या आंतरराष्ट्रीय कंपनीतर्फे सीपीआररुग्णालयात आयसीयू सहित ३४ बेडचा प्रशस्त कोरोना वॉर्ड देणगी स्वरुपात तयार करण्यात आला आहे. या वॉर्डद्वारे कोल्हापुरातील कोरोना रुग्णांवर प्रभावी उपचार करणे शक्य होणार आहे.उद्या शुक्रवार दि.१९ जून रोजी सायंकाळी सात वाजता मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या वॉर्डचा लोकार्पण सोहळा पार पडेल. या सोहळ्यास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हापोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, को.म.न.पा. आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे सीईओ श्री. अमन मित्तल, अधिष्ठाता डॉ.सौ.आरती घोरपडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर, क्रॉम कंपनीचे डायरेक्टर डॉ.धनंजय लाड, सेलीब्रेशन्स इव्हेंट्सचे सीईओ नितीन पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
Leave a Reply