
सध्या टेलिव्हिजन मालिकांचे शूटिंग ठप्प असल्यामुळे सोनी सबने त्यांच्या काही उच्च प्रशंसित मालिकांचे पुन:प्रसारण करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणे सुरू ठेवले आहे. चाहत्यांना आनंद देण्यासोबत त्यांचे मनोरंजन करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सोनी सब चाहत्यांना सध्या हसवून-हसवून लोटपोट करणारी रोमँटिक विनोदी मालिका ‘जीजाजी छत पर है‘ पाहण्याचा आनंद देत आहे. या मालिकेमध्ये अत्यंत प्रतिभावान व मोहक हिबा नवाब आहे.पात्रांमधील प्रेमळ साहचर्य आणि ईलायची व पंचमची साहसी प्रेमकथा, तसेच त्यांचे नाते ईलायचजीचे खूपच काळजी करणारे वडिल मुरारीपासून लपवून ठेवण्यासाठी विलक्षण प्रयत्न अशा घटकांमुळे मालिका खूप लोकप्रिय ठरली होती आणि आजही सोनी सबवर या मालिकेचे पुन:प्रसारण सादर केले जात असताना देखील मालिका अनेकांची मने जिंकत आहे.मालिका ‘जीजाजी छत पर है‘चा शेवट एका सुंदर टप्प्यावर झाला, जेथे पंचम व ईलायचीचा प्रवास बहुप्रतिक्षित ‘वैवाहिक जीवनावर‘ येऊन थांबला. चॅनेलवर पुन्हा एकदा मालिका प्रसारित केली जात असताना प्रेक्षक ईलायचीच्या प्रसिद्ध ‘टॅण्टे‘चा आनंद घेत आहेत.हिबा नवाब ईलायचीच्या भूमिकेतील दिवसांना उजाळा देत आणि ‘जीजाजी छत पर है‘साठी मिळालेल्या प्रेमाबाबत बोलताना म्हणाली, ”ईलायचीची भूमिका नेहमीच माझ्या मनाच्या खूप जवळ आहे आणि राहिल. तिचे व्यक्तिमत्त्व, विशेषत: तिचा खोडकरपणा आणि उत्स्फूर्त स्वभाव प्रेरणादायी आहे आणि मला माझ्या व्यक्तिमत्वामध्ये बदल करण्यामध्ये मदत झाली आहे. सध्या मी घरीच असल्यामुळे जीवन काहीसे कंटाळवाणे बनले आहे आणि मला ईलायचीच्या मसालेदार जीवनाची आठवण येत आहे.”मालिका व तिच्या भूमिकेला सातत्याने मिळत असलेले प्रेम व पाठिंब्याबाबत बोलताना ती म्हणाली, ”सध्या मी फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांनी कनेक्ट होत आहे. मी जेव्हाजेव्हा लाइव्ह होते, तेव्हातेव्हा मला नेहमीच सोनी सबवर ‘जीजाजी छत पर है‘ मालिका कधी परतणार आहे याबाबत विचारले जाते. लोक मला ईलायची म्हणूनच ओळखत आहेत आणि ते पाहून मला खूप चांगले वाटते. कारण ते प्रेक्षकांची मने जिंकण्यामध्ये भूमिकेच्या यशासोबत माझ्या अथक मेहनतीचे फळ आहे.”‘जीजाजी छत पर है‘च्या स्पेशल चाहत्याबाबत बोलताना हिबा म्हणाली, ”मला आनंद होत आहे की, मालिका पुन्हा एकदा प्रसारित केली जात आहे. माझ्यापेक्षा माझे मोठे चाहते म्हणजेच माझे पप्पा नेहमी ही मालिका पाहतात. मी कदाचित एखादा एपिसोड चुकवू शकते, पण ते कधीच चुकवणार नाहीत.”
पाहा हिबा नवाबला ईलायचीच्या भूमिकेत दर सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता फक्त सोनी सबवर
Leave a Reply