
कोल्हापूर:लडाख सीमेवर चीनने केलेल्या भ्याड हल्ल्यात 20 जवान शहीद झाले. आज आम आदमी पार्टीच्या वतीने शिवाजी चौक येथे जमून चीनने केलेल्या या कृत्याचा निषेध करण्यासाठी ‘आक्रोश आंदोलन’ करण्यात आले. यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी ‘वीर जवान अमर रहे’, ‘चीनी सरकार मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या. यावेळी सर्व शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी बोलताना ‘आप’ चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई म्हणाले “चीनने केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून आम आदमी पार्टीच्या वतीने राज्यभरात ‘आक्रोश आंदोलन’ करण्यात आले. काल पंतप्रधान मोदी सर्वपक्षीय नेत्यांना संबोधित करताना म्हणाले की चीनने कोणत्याही प्रकारची घुसखोरी केलेली नाही. आशा प्रकारचे वक्तव्य दुर्दैवी म्हणावे लागेल. यामुळे देशाच्या सैनिकांचे मनोबल खचत आहे. चीनच्या विरोधात आम्ही सरकारसोबत आहोत परंतु त्यांनी देशाकडून खरी परिस्थिती न लपवता चीनला सडेतोड उत्तर द्यावे”यावेळी जिल्हाध्यक्ष निलेश रेडकर, युवाध्यक्ष उत्तम पाटील, शहर उपाध्यक्ष संतोष घाटगे, सूरज सुर्वे, आदम शेख, राज कोरगावकर, दीपक नंदवानी महेश घोलपे, बसवराज हदीमनी, इलाही शेख,सचिन डफळे, धैर्यशील घाटगे, प्रेम कदम, आदी उपस्थित होते.
Leave a Reply