
कोल्हापूर:लोककल्याणाचा वसा आणि वारसा हा शाहू महाराजांचा अनुयय आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. राजर्षींच्या विचार आणि कृतीचे आचरण केल्यास स्वतःसह लोकजीवनही समृद्ध बनेल, असेही श्री मुश्रीफ म्हणाले.राजर्षी शाहू महाराजांच्या १४८ व्या जयंतीनिमित्त शाहू समाधीस्थळावर श्री मुश्रीफ यांच्यासह माजी महापौर आर. के. पवार, माजी महापौर सौ. सरिता मोरे, आदिल फरास, राजू लाटकर व मान्यवरांनी अभिवादन केले.यावेळी माजी महापौर आर. के. पवार, आदिल फरास, स्थायी समितीचे सभापती संदीप कवाळे, माजी महापौर सरीता मोरे, प्रकाश गवंडी, राजू लाटकर, नगरसेवक सचिन पाटील, विनायक फाळके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष महेंद्र चव्हाण, अतुल गवई, किसनराव कल्याणकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply