
कोल्हापूर : सामाजिक न्यायचे पुरस्कर्ते, लोककल्याणकारी राजा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज १४६ वी जयंती निमित्त राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना शिवसेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे ही जयंती अत्यंत साधेपणाने करण्यात आली. शाहूनगर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारक सुशोभीकरणासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांच्या आमदार फंडातून गतवर्षी मंजूर झालेल्या रु.१० लाख निधीच्या प्रत्यक्ष कामास आज सुरवात करण्यात आली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्त कुदळ मारून या सुशोभिकरणाच्या कामास सुरवात करण्यात आली. यासह शिवसेना शहर कार्यालय येथे शिवसेनापदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना राजेश क्षीरसागर म्हणाले, समाजातील प्रत्त्येक घटकाला न्याय मिळावा, वंचितांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजात समता, बंधुता टिकविण्याची सर्वांची जबाबदारी आहे. बहुजनांना शिक्षण, स्त्रीउद्धार, जातीभेदांचा नाश करण्यासाठी झटणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज सर्वसमावेशक विकासाचे प्रेरणास्त्रोत्र आहेत. अलौकिक प्रतिभा आणि त्यागातूनच महाराज राजर्षी झाले. आज महाराजांच्या विचाराने देशाची वाटचाल होणे गरजेचे आहे. त्यांच्या कार्याचा वसा जगभरात पोहचविण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे अनुयायी होवून त्याविचारानुसार समाजकार्य करणे ही आपली जबाबदारी असल्याचे सांगितले.शाहूनगरमध्ये गेले अनेक वर्षे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्मारक आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाची दूरदृष्टी ठेवून जिल्ह्याला समृद्ध करणारे राधानगरी धरण बांधले. हे धरण वडार समाजातील मजुरांच्याकरवी राजर्षी छत्रपती शाहू महाराजानी बांधले. धरण बांधल्यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराजानी खुशीने या शाहूनगर येथील जागा वडार समाजातील मजुरांना दिली. या मजुरांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावेच देशातील पहिली-वहिली नगरी म्हणजेच “शाहूनगर” कोल्हापुरात उभी केली. या ठिकाणी कालांतराने मुख्य चौकात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक उभे केले. या स्मारकाची डागडूजी, स्मारक सुशोभिकरण, लाईटव्यवस्था आदी विकास कामे करण्याकरिता राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी गतवर्षी आमदार फंड मधून रु. १० लाखांची तरतूद केली होती. या सुशोभिकरणाच्या कामास प्रत्यक्ष सुरवात करण्यात आल.
दरम्यान शाहूनगर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी नगरसेविका सौ. भाग्यश्री शेटके,भैया शेटके, शिवसेना उपशहरप्रमुख विशाल देवकुळे, विभागप्रमुख अश्विन शेळके, अंकुश निपाणीकर, संभाजी साजणेकर, मारुती सांगावकर, महमंद शेख, शरद वडर, संजय शिंगाडे, अनिल मोहिते, श्रीमती गुणाबाई पाटील आदी उपस्थित होते.
यासह शिवसेना शहर कार्यालय येथे पार पडलेल्या कार्यक्रमास युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, जेष्ठ शिवसैनिक दीपक गौड, उपशहरप्रमुख जयवंत हारुगले, रणजीत जाधव, तुकाराम साळोखे, सुनील जाधव, धनाजी दळवी, किशोर घाटगे, रघुनाथ टिपुगडे, कमलाकर किलकिले, कृपालसिंह रजपूत, विजय क्षीरसागर आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply