
कोविड -19 मधील बहुमूल्य योगदानासाठी नीता अंबानी आणि त्यांची संस्था रिलायन्स फाऊंडेशन यांचा जगातील नामांकित समाजसेवकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. या यादीत नीता अंबानी एकमेव भारतीय आहेत.अमेरिकेतील टाऊन अँड कंट्री या मासिकाने सन 2020 ची यादी प्रसिद्ध केली आहे. भारताच्या पहिल्या कोविड -19 रुग्णालयासारख्या तसेच गरीब आणि सामाजिक सेवांसाठी दिलेल्या मदत प्रयत्नांकरिता, नीता अंबानी यांना या यादीमध्ये स्थान देण्यात आले आहे.टिम कुक, ओप्राह विन्फ्रे, लॉरेन पॉवेल जॉब्स, लॉडर फॅमिली, डोनाटेला वर्सास आणि मायकेल ब्लूमबर्ग अशी इतर नावे देखील या यादीत आहेत.श्रीमती अंबानी आणि फाउंडेशनच्या प्रयत्नांना मान्यता देताना मासिकाने म्हटले आहे की, “रिलायन्स फाउंडेशन – रिलायन्स इंडस्ट्रीजची सामाजिक संस्था असून नीता अंबानी यांच्या नेतृत्व आणि अध्यक्षतेखाली – लाखो गरीब लोकांना अन्न तसेच अग्रणी योद्धयांना मास्क वाटले गेले” कोविड -19 रूग्णांसाठी पहिले रुग्णालय सुरू केले आणि आपत्कालीन मदत निधीसाठी 72 दशलक्ष डॉलर दान केले. ”
यावेळी बोलताना रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती नीता अंबानी म्हणाल्या, “संकटाच्या वेळी संसाधनांसह सहानुभूती दाखवणे आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांत, आम्ही संकटाच्या वेळी आपले प्रयत्न प्रभावी करण्यासाठी फाउंडेशन आणि रिलायन्स इंडस्ट्रीजणे स्वत: ला बहु-आयामी आणि पद्धतशीर प्रतिसादांनी सुसज्ज केले आहे. आमचा हा उपक्रम जागतिक स्तरावर ओळखला जात आहे याबद्दल आम्हाला आनंद आणि नम्रता आहे. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा आमची संस्था सरकार आणि समाजास मदत करण्यास कटिबद्ध आहे. ”
रिलायन्स फाउंडेशनच्या नेतृत्वात नीता अंबानी यांनी मुंबईतील स्थानिक अधिकाऱ्यांसोबत मार्च महिन्यात दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत 100 बेडचे कोविड -19 रुग्णालय बांधण्याचे काम केले. एप्रिलमध्ये बेडची संख्या 220 करण्यात आली. रिलायन्स फाऊंडेशनने “अन्न सेवा” नावाची देशव्यापी खाद्य सेवा सुरू केली असून यामध्ये आतापर्यंत सुमारे 5 कोटी जेवण दिले गेले आहे. रिलायन्स फाउंडेशन मुंबईत कोविड रूग्णांसाठी ऑनलाईन वैद्यकीय सहाय्य, घरात अलगीकरणाची सुविधा, ग्रामीण भागातील नागरिकांना मदत आणि पाळीव प्राणी, देशभरातील भटक्या प्राण्यांसाठी आरोग्यसेवेसह अनेक प्रयत्न करीत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजनेही मास्क आणि पीपीई तयार करण्यास पुढाकार दिला आणि साथीच्या विरूद्ध लढा देताना या महत्त्वपूर्ण वस्तूंच्या उत्पादनात देशाला स्वावलंबी होण्यास हातभार लावला.
Leave a Reply