तज्ज्ञ समूहाच्या मतांनुसार सातारा आणि सांगलीमध्ये रेड लाईट परिसर खुला केल्यास कोविड – 19 प्रकरणे, रुग्णालय भरती आणि मृत्यू आकड्यांचा वाढता आलेख पाहायला मिळेल. मात्र बुधवार पेठ (कराड , जिल्हा – सातारा) आणि गोकुळ नगर रेड लाईट भागात टाळेबंदी वाढविल्यास सध्या महामाथीचे थैमान वाढलेले असताना एकंदर कोविड – 19 रुग्ण संख्या आणि मृत्यू आकड्यांत साताऱ्यात 90%तर सांगलीत 60% हून अधिक घसरण आढळून येईल. हे मॉडेल हावर्ड मेडीकल स्कूल आणि येल स्कूल ऑफ मेडीसीनने तयार केले आहे. यासंबंधी अधिक माहिती www.CodeRedCOVID.orgवर पाहता येईल.या मॉडेलमध्ये असे दिसते की, जर बुधवार पेठ (कराड , जिल्हा – सातारा) आणि गोकुळ नगर भाग व्यवहारासाठी खुले केले तर रेड लाईट भागात झपाट्याने संक्रमण होऊ शकते आणि सेक्स वर्कर तसेच गिऱ्हाईकांत संसर्गाचे प्रमाण वाढलेले दिसून येईल. संभोगादरम्यान शारीरिक अंतर राखणे शक्य नसल्याने संक्रमणाचा धोका अधिक असतो. संसर्ग बाधित व्यक्ती संपूर्ण सातारा, सांगलीसह राज्यभर विषाणू प्रादुर्भाव वाढविण्यात भर घालू शकते. त्यामुळे अनेक घटकांमुळे भागात सर्वाधिक हॉटस्पॉट संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर बुधवार पेठ (कराड , जिल्हा – सातारा) रेड लाईट भाग खुला केल्यास टाळेबंदीनंतरच्या पहिल्या 90 दिवसात साताऱ्यात रुग्णालय भरती 22 पटीने तर मृत्यू संख्या 22 पटीने वाढू शकते. जपानने रेड लाईट भाग वेळीच बंद केले नाहीत आणि त्यामुळे रेड लाईट भागातील रुग्णसंख्येचा “स्फोट” पाहायला मिळाला. तसेच स्थानिक रुग्णालयांत रुग्णांचा “महापूर” दिसला. भारतात विषाणू संक्रमण शिखरावर पोहोचेल, त्यावेळी सत्तर टक्के अधिक खाटांची आवश्यकता भासेल. त्यामुळे रेड लाईट भाग खुले करण्यापेक्षा ते बंद ठेवलेले योग्य ठरेल. जर बुधवार पेठ आणि गोकुळ नगर खुले करण्यात आले तर सातारा आणि सांगलीमधील वैद्यकीय क्षमतांची आवश्यकता लवकरच शिखरावर पोहोचलेली असेल. वाढत्या प्रदुर्भावात थोड्याफार आजारी व्यक्तींना उपचार मिळाल्यास मृत्यू प्रमाणाला अटकाव करणे शक्य होईल.
Leave a Reply