
कोल्हापूर / प्रतिनिधी:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर्स व प्रशासन या एक संस्था म्हणून कार्यरत आहेत. या दोन्ही संस्था कोरीनाच्या लढाईसाठी एकत्र झाल्या आहेत. यात डॉक्टरांची भूमिका खूप महत्त्वाची ठरली.खासगी डॉक्टर्स, शासकीय डॉक्टर्स आणि प्रशासन यंत्रणा एकत्रित येऊन काम करण्याचा कोल्हापूर हा पहिलाच जिल्हा असेल. डॉक्टर्स आणि प्रशासनात एकवाक्यता असल्यानेच कोरनावर मात करणे शक्य झाले आहे असे, प्रतिपादन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनमध्ये पार पडलेल्या डॉक्टर्स डे कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. डॉक्टर व प्रशासन एकत्र येऊन काम करण्याच्या कोल्हापूरच्या पॅटर्नने राज्यात व देशात एक नवा आदर्श घालून दिला आहे असेही ते म्हणाले.
कोल्हापुरातील महापुराची परिस्थिती किंवा आता कोविड परिस्थिती असो, ही परिस्थिती उत्कृष्टपणे हाताळण्यात सर्वप्रथम सर्व डॉक्टर्सनी धीर दिला त्याचबरोबर सहकार्य केले. डॉक्टर दोन पाऊल पुढे जाऊन प्रशासनास नेहमीच मदत करतात. हे गौरवास्पद आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील इतर जिल्ह्यातील रुग्ण हाताळणे तसेच मृत्यूदर कमी ठेवण्यात आपण यशस्वी
ठरलो आहोत. पंचगंगा, आयसोलेशन, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथे अत्यंत अल्प दरात चांगले उपचार मिळत आहेत. याचा लाभ हजारो गरीब वंचित लोक घेत आहेत. म्हणूनच डॉक्टर्स व प्रशासन यांनी हातात हात घालून काम करूया आणि कोल्हापूरला निरोगी बनवूया अशी अपेक्षा कोल्हापूर महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केली.
महापुरानंतर कोल्हापूर जिल्ह्याला साथीचा विळखा बसू नये यासाठी डॉक्टरांनी यशस्वी प्रयत्न केले. आता कोरना प्रसंगातही डॉक्टर आपले सर्वतोपरी योगदान देत आहेत. शासनाला मदत करण्यास मेडिकल असोसिएशनसह सर्व वैद्यकीय संघटना नेहमीच तत्पर असतात. तरी काही वैद्यकीय समस्या शासन पातळीवर सोडवाव्यात अशी विनंती कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.आबासाहेब शिर्के यांनी यावेळी केली. इंडियन मेडिकल असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष,शिक्षणमहर्षी व पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ.बी. सी. रॉय यांच्या जयंती व स्मृतिदिना निमित्ताने संपूर्ण देशात डॉक्टर डे साजरा केला जातो. यानिमित्त मेडिकल असोसिएशन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच लॉक डाऊन काळातील डॉक्टरांच्या कलाविष्कारांच्या प्रदर्शनासही मान्यवरांनी भेट दिली.याचबरोबर मेडिकल असोसिएशन, सीपीआर, डॉ. डी.वाय.पाटील हॉस्पिटलसह खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा कोरना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.दरवर्षी हा दिवस सांस्कृतिक सोहळा म्हणून साजरा करण्यात येतो.पण यावर्षी हा दिवस आत्मसन्मान दिवस म्हणून साजरा करण्यात आला.यानंतर डॉक्टरांचा सांगीतिक कार्यक्रम फेसबुक लाईव्हद्वारे सादर करण्यात आला.
तसेच इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर, मेन्स,रोटरी क्लब ऑफ गार्गीज व इनरव्हील क्लब ऑफ सनराइज यांच्यावतीने डॉक्टरांचा गौरव करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष डॉ. आशा जाधव, सचिव डॉ. गीता पिल्लई, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.केम्पी पाटील, छत्रपती शाहू महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे, आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील, डॉ. डी.वाय. पाटील हॉस्पिटलचे प्रमुख डॉ डी.ए पाटील, डॉ. शितल देसाई, डॉ. रवींद्र शिंदे, डॉ. पी.एम चौगुले, डॉ.राजेंद्र वायचळ,डॉ. आनंद कामत, डॉ. किरण दोशी,डॉ. महावीर मिठारी, डॉ. संदीप साळोखे, डॉ.अरुण धुमाळे,डॉ. संजय घोटणे,डॉ. सूर्यकांत मस्कर, डॉ. प्रसाद चिंचणीकर, डॉ. रुपाली दळवी,डॉ. राजेंद्र चिंचणीकर डॉ. सोपान चौगुले, डॉ. अमर अडके,डॉ. शितल पाटील, डॉ. साईप्रसाद आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. नीता नरके यांनी केले तर आभार डॉ. गीता पिल्लई यांनी मानले.
Leave a Reply