
कोल्हापूर:मागील एका आठवड्यात पेट्रोल-डिझेलचे दर तब्बल 8 रुपये/लिटर वाढले आहेत. इतिहासात पहिल्यांदाच डिझेलचा दर पेट्रोल पेक्षा अधिक झाला आहे. लॉकडाउनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या सामान्य नागरिकांना आता पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका सहन करावा लागत आहे. मोदी सरकारच्या काळात ही महागाईची ‘डायन’ पुन्हा डोके वर काढत आहे. आंतराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर अत्यंत कमी असताना देखील केंद्र सरकारने भरमसाठ आयात शुल्क लावल्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर अवाजवी झालेले आहेत.या दरवाढीचा निषेध करण्यासाठी आज आम आदमी पार्टी, कोल्हापूरच्या वतीने ‘बोंब मारो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘पेट्रोल-डिझेलचे दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो’, ‘पेट्रोल-डिझेल दरवाढ मागे घ्या’ या घोषणांनी छ. शिवाजी चौक दुमदुमला होता. आंदोलनस्थळी दुचाकी गाडी झोपवत त्याभोवती बोंब मारून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध नोंदवत अनोखे आंदोलन करण्यात आले.यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, युवाध्यक्ष उत्तम पाटील, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, संपदा मुळेकर, राज कोरगावकर, नीता पडळकर, नितीन पोवार, विराज क्षीरसागर, प्रथमेश सूर्यवंशी, बसवराज हदीमनी, लखन काझी दीपक नंदवानी, बाळासो जाधव, सचिन डाफळे, विशाल वठारे, धैर्यशील शिंदे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply