
कोल्हापूर/प्रतिनिधी : जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन कोल्हापूर जीपीएतर्फे शिंगणापूर रोड येथील मातोश्री वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील वयोवृद्धांची मोफत रक्त तपासणी करून समुपदेशन व मोफत औषध देऊन डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित डॉकटर यांनी आरोग्याची काळजी काही घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले व व्यायामाचे महत्त्व समजावून सांगितले.तर अध्यक्ष डॉ शिरीष पाटील यांनी आज आषाढी एकादशी आहे तर आम्ही मातोश्री वृद्धाश्रमास भेट देऊन तपासणी केली इथेच आमची पंढरीची वारी झाली आहे असे उदगार काढले.
यावेळी प्रमुख उपस्थिती मातोश्री वृद्धाश्रमाच्या अध्यक्षा श्रीमती राजशेखर व श्रीमती चिटणीस उपस्थित होत्या.त्यांच्यासोबत
जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन चे अध्यक्ष डॉ.शिरीष पाटील सचिव डॉ.अरुण धुमाळे खजिनदार डॉ.महादेव जोगदंडे,डॉ. विनायक शिंदे, डॉ. शुभांगी पार्टे, डॉ उद्यम व्होरा, डॉ शिवपुत्र हिरेमठ डॉ राजेश सातपुते, डॉ. अजित कदम,डॉ. शिवराज देसाई,डॉ. शिवराज जितकर. डॉ. राजेश कागले आदींची उपस्थिती होती.
Leave a Reply