
कोल्हापूर: छत्रपती शाहू महाराज हे समस्त बहुजन समाजाचे व रयतेचे राजे आहेत हे आम्हाला शाहूंच्या बद्दल कधीतरी प्रेम उत्पन होणाऱ्यांनी सांगू नये. कोल्हापूरच्या विकासात छत्रपती शाहू महाराजांचा स्पर्श आहे आणि या कोल्हापूर नगरीमध्ये जी काही ऐतिहासिक स्थळे, गोष्टी आहेत या केवळ आणि केवळ दूरदृष्टी असणाऱ्या शाहू राजांनी निर्माण केल्या आहेत. अशा राजाच्या जयंतीदिनी पायामध्ये चप्पल घालून त्यांच्या प्रतिमेस पूजन केले हा छत्रपती शाहूंचा अपमान नाही का ? छत्रपती शाहू राजे कर्मकांड मानत नव्हते हे जरी मान्य असले तरी, कोल्हापूरात छत्रपती शाहू राजांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेची पूजा चप्पल घालून केलेली चालेल कशी ? त्याठिकाणी उपस्थित सर्वांच्या पायात चप्पल दिसतात मग आत्मक्लेश आणि माफी हे केवळ त्या एकट्या नेत्याला कसे लागू पडेल. यावर संबधीत पक्षाच्या एका तथाकतिथ नेत्याने आत्मक्लेश करून माफी मागितली. खरेतर, उपस्थित सर्वांनीच माफी मागायला हवी होती किंवा सर्वांनीच आत्मक्लेश करायला पाहिजे होते असे असताना केवळ या संबंधित सोशल मिडियामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर या तथाकतिथ नेत्याने याबाबत आत्मक्लेश करणे हि केवळ नौटंकी आहे. समाधी स्थळाची स्वच्छता करणाऱ्या कार्यकर्त्यांचा निषेध करणाऱ्यांनी ज्या दिवशी या नेत्याने पायात चप्पल घालून छत्रपती शाहूंचा अवमान केला त्यावेळी अशी धडाधड पत्रे का काढली नाहीत ? आणि अशा पद्धतीने संपूर्ण कोल्हापूरचे लक्ष वेगळ्या दिशेला वळवणा-या नौटंकीबाज पदाधिकाऱ्यांनी केवळ माफी मागून वेळ मारून नेली असताना छत्रपती शाहूंचे खऱ्या विचारांचे पाइक असणारे कार्यकर्ते हा शाहूंचा अवमान सहन करू शकले नाहीत आणि मग त्यांनी त्या समाधी स्थळाची स्वच्छता करून छत्रपती शाहू राजांची माफी मागितली असे असताना केवळ राजकीय विद्वेषापोटी किंबहूना भारतीय जनता पार्टीला एका वेगळ्या दृष्टीने पाहणाऱ्यांनी गोमुत्र शिंपडले असा कांगावा केला. असे असताना सत्य परीस्थिती लक्षात न घेता काही संस्था यामध्ये जातीयवाद आणि पक्ष विद्वेष आणून कोल्हापूरचे सौदार्याचे वातावरण बिघडवू पाहत आहेत. छत्रपती शाहू महाराज हि केवळ एका संस्था, संघटना, जातीचे नसून ते बहुजन समाजाचे उद्दारकर्ते होते आणि समाधी स्वच्छतेसाठी गेलेले सर्व कार्यकर्ते हे बहुजन समाजातील आहेत हे त्यांनी विसरू नये. याबाबत शुद्ध-अशुद्ध, पवित्र-अपवित्र, उच्च-नीच या कल्पनांना आमच्याकडे थारा नाही केवळ छत्रपती शाहू प्रेमापोटी हा चबुतरा स्वच्छ केला यास वेगळ्या पद्धतीचा रंग देऊ नये अशा आशयाचे पत्रक भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात येत आहे
Leave a Reply