
कोल्हापूर:भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष .आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी नाभीक व्यवसायिकांना साहित्यरूपी मदतीचा हात दिला आहे. सँनिटायझर, अँपरन, मास्क, नँपकीन व हँडग्लोज असे आवश्यक साहीत्याचे कीट कोल्हापूर शहरातील 1000 केस कर्तनालयात वितरीत करण्यात येणार आहे.
आज रंकाळा बस स्थानक येथिल नाभीक समाजाच्या बोर्डींग हॉलमध्ये धान्य कीट वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, को.म.न.पा.विरोधी पक्षनेते विजय सुर्यवंशी, नाभीक समाजाचे जेष्ठ मनोहर झेंडे, श्रीकांत झेंडे, नाभीक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष सयाजी झुंजारे, अविनाश यादव, मोहन चव्हाण, किशोर खराडे, सतिश चव्हाण, दिपक खराडे, महेश जाधव, राहूल टिपुगडे, दिलीप टिपूगडे आदी उपस्थीत होते.
Leave a Reply