
तारळे (अतुल पाटील): तारळे खुर्दपैकी चोरवाडी येथील विक्रम बंडोपंत डवर यांची भारतीय वायुसेनेमध्ये गरुड कमांडो पदी नुकतीच निवड झाली. विक्रम डवर यांचे शिक्षण तारळे येथील प्राथमिक शाळेत व शिवाजी हायस्कूल येथे झाले, तर पदवीचे शिक्षण भोगावती महाविद्यालय येथे झाले. भरतीपूर्वीचे संपूर्ण शिक्षण यमकांडे येथील द्रोण अकादमी येथे झाले असून विक्रम डवर यांचे वडील शेतकरी आहेत.शेतकरी कुटुंबातील मुलाने एवढी उत्तुंग भरारी घेतली याबद्दल संपूर्ण पंचक्रोशीत विक्रम डवर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Leave a Reply