
इचलकरंजी:आज इचलकरंजीत कोरोना संकटाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे..आज जवळपास कोरोना पेशंटाच्या संख्येने साठी पार केली आहे…प्रशासनाने आता हलचाल सुरू केली असली तरी 100% लाॅकडाऊन नसल्याने अजूनही नागरिकांच्यात गांभीर्य दिसत नाही.अशावेळी कोरोनाचे हे संकट कसे रोखायचा हा प्रश्न सर्वांना चिंताजनक वाटत आहे..त्यासाठी आता इचलकरंजीतील उद्योजक ,व्यापारी स्वयंस्फुर्तीने स्वतःचे दुकान,शाॅप बंद करून स्वयंघोषीत जनता कर्फ्यूला प्रोत्साहन देत आहेत…आज याची सुरवात राजू बोरगावे या उद्योजकांनी आपले टिव्हिएस शो रूम पाच दिवस पुर्णतः बंद करून केली आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल व कोरोना मुक्त इचलकरंजीसाठी हा छोटासा प्रयत्न असल्याचे त्यांनी मनोगतात सांगितले.
Leave a Reply