
कोल्हापूर/ प्रतिनिधी : इन्हरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्या वतीने ‘डॉक्टर्स डे’ चे औचित्य साधून कोल्हापूर शहरातील काही डॉक्टरांचा *कोविड योद्धा* म्हणून गौरव करण्यात आला. कोल्हापूर मेडिकल असोसिएशन येथे हा कार्यक्रम पार पडला.कोल्हापुरातील वैद्यकीय सेवा संस्था नेहमीच समाजासाठी कार्यतत्पर राहिल्या आहेत. याचा अनुभव मागील पुरामध्ये पण आला आणि आजच्या कोरोना महामारीच्या काळातही सर्व डॉक्टर आणि इतर वैद्यकीय मदतनीस व नर्स यांनी कोल्हापूरमध्ये आरोग्य जपण्यासाठी आणि कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मोलाचे योगदान दिलेले आहे. यामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता सेवाभाव दाखवून त्यांनी जे कार्य केले त्याला अभिवादन म्हणून इन्हरव्हील सनराईजने नेहमीच सामाजिक बांधीलकी जपली आहे. असे प्रतिपादन या क्लबच्या अध्यक्षा रितू वायचळ यांनी केले. कार्यक्रमास सचिव गीतांजली ठोमके, खजानिस ममता गद्रे आणि क्लब सदस्या डॉ.वैशाली पाटील, डॉ.कावेरी चौगुले, डॉ.अनुराधा चौगुले, डॉ.मंजिरी घेवारी, मंजिरी देवांनावर, प्रिया मेंच, ज्योती जाधव, स्नेहल ढकोजी, वृषाली बाड आणि गीतांजली घाडगे आदी उपस्थित होत्या.
Leave a Reply