
कोल्हापूर :जगभरात चीनमध्ये निर्माण झालेल्या कोरोना विषाणुमुळे अनेक नागरीकांचा जीव धोक्यात आलेला आहे जगभरातील काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत सदर विषाणुचा भारतातही शिरकाव झालेला आहे त्यामुळे दि २२ मार्च-२०२० पासून देशात तसेच राज्यात लाॅकडाॅऊन जाहीर झाले आजूनही लाॅक डाॅऊन आहे जिथे लाॅक डाॅऊनमध्ये सुट दिलेली आहे तेथेही अजून उद्योगधंदे चालू नाहीत आजही लोकांच्या हाताल काम नाही अशी परिस्थिती आहे आज गरीब मध्यमवर्ग यांना रेाजचे जीवन जगायला पैसे नाहीत ते महावितरण कंपनीने पाठविलेली तीन महिन्यांची वीज बिले कशी भरणार लाॅकडाॅऊनमुळे महावितरण कंपनीला वीज ग्राहकांचे मीटर रिडींग घेता आले नाही ही वस्तुस्थिती असली तरी माहे जून महिन्यात लाॅकडाॅऊनमध्ये सुट मिळताच महावितरण कंपनीने एकदम माहे मार्च ते मे-२०२० असे एकत्रित मीटर रिडींग घेऊन त्याप्रमाणे वीज ग्राहकांना बिले दिलेली आहेत त्यातच एप्रिल-२०२० पासून वीज दरामध्ये प्रचंढ दरवाढ करण्यात आली आहे
अधिच कोराना विषाणूमुळे हैरान झालेले नागरीक महावितरणच्या एकदम तीन महिन्याच्या आलेल्या वाढीव वीज बिलामुळें त्रस्त झाले आहेत त्यामुळे ग्राहकांच्यात असंतोष आहे या महामारीमुळे अनेक नागरीकांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे अनेक लोक आर्थिक आडचणीत आलेले आहेत अनेकांचा रोजगार,उधोग व व्यवसाय बुडालेला आहे .केंद्र व राज्य शासनाने सर्व लोकांना घरातून बाहेर पडू नये असे सांगितले त्यामुळे सर्वच लोकांना घरातून बाहेर पडता आले नाही हा त्यांचा दोष नाही लाॅकडाॅऊनमुळे कोणाच्या हाताला काम मिळालेले नाही त्यामुळे त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे सदर लाॅकडाॅऊनमुळे देशात आर्थिक आणीबाणी सारखी परिस्थिती आहे अनेक छोटे मोठे उद्योगधंदे बद पडले आहेत त्यामुळे लोकांच्या हाताचा रोजगार बुडाला आहे त्यामुळे त्यांच्या रोजी रेाटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे अशावेळी कुटूंब प्रमूख म्हणून राज्य शासनाने काळजी घेणे गरजेचे आहे त्यामुळे लाॅकडाॅऊन काळातील तीन महिन्यांची घरगुती वीज बिले ३०० युनिटस् पर्यंत राज्य शासनाने भरावे अशी आमची राज्य शानाकडे मागणी आहे या मागणीसाठी सर्वपक्षीय घरगुती वीज ग्राहकांच्या वतीनेजिल्हाधिकारी,प्रातकार्यालय,तहसीलदार किंवा महावितरणचे कार्यालय यांच्या दारात वाढीव वीज बिलांची होळी आंदोलन करणार आहोत सदर आंदोलन करुन तीन महिन्याचे ३०० युनिटस् पर्यंत वीज बिल राज्य शासनाने भरावे या मागणीचे निवेदन मा मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांच्या नावाने देणार आहोत .यावेळी महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष वीज तज्ञ प्रताप होगाडे,बाबासो पाटील-भुयेकर,विक्रांत पाटील-किणीकर,वीज ग्राहक मित्र राजू आलासे,राजेंद्र सुर्यवंशी,बाबासाहेब देवकर,चंद्रकांत पाटील-पाडळीकर, आर के पाटील,समिर पाटील, संपर्क प्रमुख मारुती पाटील,जावेद मोमीन आदी उपस्थित होते
Leave a Reply