
कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने कोरोना महामारी संकटामुळे अडचणीत असणाऱ्या अंबाबाई मंदीरात काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना व मराठी चित्रपट व्यवसायातील गरजु कलावंत आणि कर्मचारी यांना जीवनावश्यक अन्न धान्याचे किट वाटप करण्यात आले. गेले चार महिने अंबाबाई मंदिर बंद आहे.यामुळे येथे काम करणाऱ्या सुरक्षा रक्षक व चित्रपट व्यवसाय बंद असल्याने तसेच उत्पन्नाचे साधन नसल्याने देवस्थान समितीकडून ही मदत देण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष महेश जाधव तसेच सदस्य शिवाजी जाधव, राजेंद्र जाधव सचिव विजय पोवार यांच्या सहकार्याने ही कीट देण्यात आली. या वेळी देवस्थान समितीचे कर्मचारी उत्तम मेटके यांच्यासह कर्मचारी उपस्थीत होते.
दिि
Leave a Reply