
सोनी सबवरील मालिका ‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा’ने प्रेक्षकांसाठी रोमांचचा स्तर उंचावत ठेवला आहे. आगामी नवीन एपिसोड्समध्ये दुष्ट शक्ती व जिनची निर्माती मल्लिकाचा कपटी प्रवेश, तसेच अखेर विवाह बंधनात अडकणारे प्रेमीयुगुल अलाद्दिन व यास्मीनच्या बहुप्रतिक्षित विवाहासह रोमांचचा स्तर वाढणार आहे.जफरचा मृत्यू आणि साम्राज्यामधून सर्व दुष्ट शक्तींचा नायनाट केल्यानंतर संपूर्ण कुटुंब भव्य विवाह सोहळ्याच्या तयारीला लागले आहे. पण अलाद्दिनला माहित नाही की, त्याचा हा आनंद काही काळापुरताच आहे. दुष्ट शक्तीची निर्माती मल्लिकाने बगदादमध्ये प्रवेश केला आहे. सर्वजण विवाहाच्या तयारीमध्ये असताना जोडप्यांना आशिर्वाद देण्यासाठी ओळखली जाणारी मरियम खतून या जोडप्याला आशिर्वाद देण्यासाठी राजवाड्याकडे येत असते, पण वाटेत तिचा सामना मल्लिकासोबत होतो. मल्लिका मरियम खतूनला राखेमध्ये बदलून टाकते आणि राजवाड्यामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी तिचे रूप घेते.मरियम खतूनच्या वेषात आलेली मल्लिका जोडप्याला आशिर्वाद देण्यापूर्वी अलाद्दिनला तिला पाहिजे असलेली गोष्ट देण्यासाठी त्याच्या अम्मीची शपथ घेण्यास सांगते. अलाद्दिन त्याच्या अम्मीची शपथ घेणारच असतो की, त्याला मल्लिकाच्या पाठीवर टॅट्टू दिसतो. त्याला जिनूने एकदा सांगितलेली गोष्ट आठवते की, मल्लिकाला तिच्या असामान्य टॅट्टूमधूनच ओळखता येऊ शकते. अलाद्दिनला धक्का बसतो आणि मल्लिका तिला पाहिजे असलेली गोष्ट देण्यासाठी त्याला घाबरवते आणि तसे केले नाही तर त्याचे संपूर्ण कुटुंब संकटात सापडेल. आपली इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी मल्लिका शेवटच्या जिन टॉनिकसह अम्मीला जिनमध्ये बदलते.
Leave a Reply