
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेतील कर्मचारी आणि अधिकारी यांनी वेळोवेळी अचानक उद्भवणार्या खर्चासाठी आगाऊ रकमा घेतल्या आहेत. या रकमेचा कित्येक वर्षे हिशोब दिलेला नाही, तसेच या रकमा जमा केलेल्या नाहीत. सदर रक्कम 7 कोटी 1 लाख 54 हजार 844 रुपये इतकी प्रचंड आहे. या रकमेच्या संदर्भात तत्कालीन आयुक्त, महापौर आणि संबंधित अधिकार्यांनी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. याविषयी पत्रकार परिषद घेऊन घोटाळ्याचे गांभीर्य जनतेसमोर उघड केले होते, तसेच त्यानंतर महापालिका आयुक्तांना भेटून त्यांनाही प्रकरणाचे गांभीर्य सांगितले होते. त्या वेळी ‘आपण यात लक्ष घालू’, असे आश्वासन आयुक्तांनी दिले होते; पण त्याबाबत पुढे काय झाले, असे लोकांना कळायला पाहिजे. तसे झालेले नाही. त्यामुळे यात काळेबेरे आहेच. महापालिकेच्या पर्यायाने जनतेच्या निधीचा अपहार करणे हा फौजदारी स्वरुपाचा गुन्हा असून तो कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचारी, अधिकारी आणि संबंधित सर्व व्यक्ती यांनी कट रचून, संगनमताने व गुन्हेगारी कारणाने केला आहे. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचार्यांनी तसलमातच्या नावाखाली उचलेल्या आणि हिशोब न दिलेल्या आजी/माजी कर्मचार्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, या मागणीची तक्रार 17 जुलै या दिवशी हिंदू विधीज्ञ परिषदेच्या साहाय्यतेने शिवानंद स्वामी यांनी कोल्हापूर येथील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे. ही तक्रार पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी स्वीकारली. या अधिवक्ता समीर पटवर्धन आणि अधिवक्त्या प्रीती पाटील उपस्थित होत्या.
घोटाळ्यांची काही उदाहरणे –
1. वर्ष 1951 ते 30 मार्च 2007 अखेर वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या कर्मचार्यांनी डिपार्टमेंटच्या नावे 3 कोटी 67 लाख 61 हजार 250 तसलमात उचलली आहे. त्या रकमेचा हिशोब अथवा रकम परत जमा केलेली नाही.
2.औषधोपचारांच्या नावाखाली उचललेले 25 लाख 38 हजार 907 रुपये परत जमा केले नाहीत.
3. कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमासाठी (के.एम्.टी.) 1 कोटी 15 लाखांहून अधिक रुपयांचा खर्च असाच ‘दाखवला’ गेला आहे.
4. प्रवास खर्चाच्या नावे 2017/18 मार्च अखेर पर्यंत कर्मचार्यांनी 3 लाख 72 हजार 212 रुपये तसलमातीच्या नावाखाली उचललेली रकम जमा केली नाही अथवा त्याचा हिशोब दिला नाही.
5. पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी 10 महिन्यांमध्ये सरासरी 1 कोटी 85 हजार रुपयांवर खर्च झालेला आहे.
6. जानेवारी 2018 मध्ये वार्षिक स्नेहसंमेलनासाठी 35 हजाराची आगाऊ रक्कम घेतली आहे.
7. मंत्रालयातील सचिवांच्या दौर्यासाठी 26.10.2017 या दिवशी 10 हजार रुपये खर्च दाखवला आहे.
Leave a Reply