जिल्हयात 20 ते 26 जुलै प्रतिबंधात्मक आदेश: काय राहणार सुरू?

 

कोल्हापूर: जिल्हयात कोरोना विषाणू (कोविड-19) प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला असून या आदेशानुसार जिल्हयात दिनांक 19 जुलै 2020 रोजी रात्री 12 वा. ते दिनांक 26 जुलै 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत काही बाबी वगळता सर्व आस्थापना, सेवा, नागरिक व वाहने यांची हालचाल संपूर्णत: बंद ठेवण्यात आली आहे.
यामध्ये फक्त सुट दिलेल्या बाबी, सेवेतील वाहने व प्रवासी वगळून उर्वरित सर्व कोल्हापूर जिल्ह्यात येणारी व जिल्ह्याबाहेर जाण्यास प्रवासी व वाहनांना तसेच लग्न, साखरपुडा, मुंज, वाढदिवस इ. कार्यक्रमांना बंदी असेल. बंदी आदेशातुन सुट दिलेल्या बाबी दुध, औषधे इ. सेवांसाठी नागरिकांना सकाळी 6 ते सकाळी 9 व सायंकाळी 5 ते सायंकाळी 7 या कालावधीत खाजगी आस्थापनामध्ये जाता येईल. अत्यावश्यक व तातडीच्या वेळी मात्र नागरिकांना इतर वेळी अत्यावश्यक बाबी व सेवा घेता येतील.
या बंदीआदेशातुन खालील बाबींना सुट देण्यात येत आहे. यामध्ये अ) अत्यावश्यक सेवा व आस्थापना. 1) सर्व खाजगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशूचिकित्सा सेवा, औषध सेवा, हॉस्पीटल संलग्न सेवा देणाऱ्या आस्थापना. 2)  बँक एटीएम, कॅश रीप्लेनिशिंग एजन्सी (CRA) ची कामे सुरु राहतील. 3) मा. न्यायालये व अत्यावश्यक सेवेतील राज्य व केंद्र सरकारी कार्यालये कमीत कमी अधिकारी / कर्मचारी यांचे उपस्थितीत सुरु राहतील.  4) दैनिक वर्तमानपत्रे, नियतकालिके, यांची छपाई व वितरण व्यवस्था तसेच डिजीटल/प्रिंटमिडिया यांची कार्यालये शासकीय नियमानुसार सुरु राहतील. वर्तमानपत्रे वितरण सकाळी 5 ते सकाळी 9 या वेळेमध्ये अनुज्ञेय राहील. 5) सर्व वैद्यकीय, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, सफाई कर्मचारी व ॲम्ब्यूलन्स यांना वाहतूकीसाठी परवानगी राहील. त्यासाठी वेगळा पास अथवा परवानगी घेणेची आवश्यकता नाही. 6) पेट्रोल/डिझेल पंप फक्त अत्यावश्यक सेवेतील शासकीय वाहने, वैद्यकीय सुविधा पुरवणारी वाहने व शासकीय धान्य पुरवठा करणारी वाहने इ. साठीच सुरु राहतील. 7) वृध्द व आजारी व्यक्तीकरिता नियुक्त केलेले मदतनीस यांच्या सेवा सुरु राहतील. ब) जीवनावश्यक सेवा व आस्थापना.
ब) 1) दुध संकलन, वाहतूक सकाळी 5 वा. ते सकाळी 9 वा. व सायंकाळी 4 ते सायंकाळी 7 वा. पर्यंत सुरु राहील. 2) किरकोळ दुध विक्री व घरपोच दुधाचे वितरण सकाळी 6 ते सकाळी 9 वा. पर्यंत सुरु राहील. 3) एलपीजी गॅस घरपोच वितरण करणाऱ्या आस्थापना सकाळी 9 ते सायंकाळी 7 वा. पर्यंत.सुरु राहतील. 4) ग्रामपंचायत, नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रातील सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन व पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या आस्थापना सकाळी 9 ते सायंकाळी 7 वा. पर्यंत सुरु राहतील. 5) दुरध्वनी, इंटरनेट व बँक एटीएम संबंधीत आस्थापना सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरु राहतील, 6) वंदे भारत योजनेंतर्गत कोविड-19 करिता वापरात असलेले हॉटेल, डॉक्टर्स, स्टाफ, नर्स व संस्थात्मक अलगीकरण साठी घेतलेले हॉटेल, लॉज व इतर इमारती सूरु राहतील.
क) उद्योगधंद्याबाबतीत 1) कोल्हापूर जिल्ह्यातील शहरी भागातील सर्व उद्योगधंदे बंद राहतील. परंतू ज्या उद्योगधंद्यात व बांधकामांचे साईटवर कामगारांना पूर्ण वेळ राहणेची सोय आहे असे कामगार व त्या उद्योगातील माल वाहतूक बाहेर न करणेच्या अटीवर असे उद्योग व बांधकामे सुरु ठेवणेस परवानगी असेल. त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवेचे काम करणाऱ्या माहिती तंत्रज्ञान आस्थापना 15% कर्मचारी क्षमतेने सुरु राहतील. 2) ग्रामीण भागातील एमआयडीसी किंवा खाजगी किंवा सहकारी औद्योगिक वसाहतीतील सर्व औद्योगिक आस्थापना तसेच अत्यावश्यक सेवेचे काम करणाऱ्या माहिती तंत्रज्ञान आस्थापना 25% कर्मचारी क्षमतेने सुरु राहतील. अशा आस्थापनांनी त्यांची कर्मचारी क्षमता प्रादेशिक अधिकारी, म.औ.वि.मं. व जिल्हा उद्योग अधिकारी (DIC) यांचेकडून प्रमाणित करुन घ्यावी. या आस्थापनेमधील सर्व अधिकारी / कर्मचारी /कामगार यांनी त्यांचे ओळखपत्र व उद्योग विभागातील संबंधीत अधिकारी यांनी प्रमाणित केलेले आस्थापनेचे पत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील.
ड) ग्रामीण भागातील शेतीची कामे. इ) इतर अनुषंगाने 1) अंत्यसंस्कार / अंत्ययात्रे साठी जास्तीत जास्त 10 नातेवाईक / नागरिक यांना हजर राहता येईल. मृत व्यक्तींच्या नजीकच्या व्यक्तींचे सांत्वन शक्यतो दूरध्वनीवर करण्याबाबत सुचित करण्यात येत आहे. ई) कोल्हापूर जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचे आदेशाप्रमाणे अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तू व सेवा वगळता इतर सर्व प्रकारच्या आस्थापना बंद राहतील.
        बंदी आदेशातुन सुट दिलेल्या सर्व सेवा व आस्थापनामध्ये वावरणाऱ्या सर्व व्यक्तींनी पूर्ण वेळ मास्क, सॅनिटायझर व सुरक्षीत अंतर इ. बंधने पाळणे आवश्यक आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्ती व वाहनांना ई परवाने स्थगित
जिल्ह्यात 20 जुलै पासून लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यामुळे इतर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येण्यासाठी दैनंदिन किंवा इतर स्वरूपातील प्रवासाचे कोणतेही ई-परवाने तसेच इतर परवानग्या आजपासून पुढील दोन आठवडे कालावधीसाठी देण्यात येणार नाहीत.
यामध्ये केवळ वैद्यकीय तातडीची खात्री झाल्यास व सदर व्यक्ती आपल्या क्षेत्रातील रहिवासी असल्यासच (आधारकार्ड पत्यानुसार) परवानगी देण्यास हरकत नाही. त्याचप्रमाणे यातून मालवाहतूक व अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय तातडीस सुट असलेल्या व्यक्तींना व वाहनांना सुट राहील, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केले आहे.
  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!