कोल्हापूर:कोल्हापूर मधील कोरोनाची व्याप्ती आणि परिस्थिती अत्यंत भयावह बनली असून केवळ आठवड्याभरातच रुग्णांची संख्या कोल्हापूर शहरात झपाट्याने वाढत आहे. त्यातच शासकीय रुग्णालयात बेड उपलब्ध होत नसल्याचे कारण सांगून रुग्णाला अत्यंत गंभीर परिस्थिती असतानासुद्धा परत पाठवले जात आहे ही प्रशासनाची निष्क्रियता असून यावरून कोल्हापूरातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडलेली असल्याचे दिसून येते. मागील चार दिवसांमध्ये जिल्ह्यात सुमारे बाराशे ते तेराशे नव्या रुग्णांची भर पडली यामध्ये शहरातील चारशे रुग्णांचा समावेश आहे. त्या तुलनेत उपचारासाठी बेडची संख्या वाढवणे अपेक्षित होते मात्र प्रशासन हि यंत्रणा उभी करण्यात अपयशी ठरलेले दिसते. काल कोल्हापूर शहरांमधील तीन रुग्णांना केवळ हॉस्पिटल मध्ये ॲडमिशन न मिळाल्यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.तसेच कोल्हापूरातील विविध ठिकाणी कोविड केअर सेंटरवरही अनास्था असल्याचे दिसून येते. या विषयांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता प्रशासनाला मदत होईल अशा पद्धतीची भूमिका कायम राहिली आहे आणि यापुढे देखील राहील. मात्र वेळोवेळी प्रशासनाला मदतीचा हात दिला असता प्रशासने तो झिडकारला आहे.
Leave a Reply