
कोल्हापूर : शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्य वाढदिवसानिमित्त सीपीआर रुग्णालयास विशेष निधीतून रु.१ कोटींच्या बेड व कपाटे या साहित्यांचे वितरण करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असणारे सामाजिक कामाद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. गेल्या दहा वर्षात सीपीआर रुग्णालयात विविध उपक्रम राबवून नवसंजीवनी देण्यास यशस्वी झालो आहे. आजच्या उपक्रमातून नक्कीच सीपीआर रुग्णालयातील उपचार पद्धतीस गती मिळून त्याचा फायदा तत्पर रुग्णसेवेस होणार असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.
राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून शासनाच्या ४२१७ या हेडमधून मंजूर झालेल्या रु.१ कोटींच्या निधीतून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) येथे खाटांचे (बेड) व कपाटे साहित्य प्रदान करण्यात आल.गेल्या दहा दिवसात कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येचा वाढता आलेख पाहता, आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा स्पष्ट होताना दिसत आहेत. कोरोनाच्या महामारीने आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची गरज जाणवते. त्यामुळे सामाजिक भान जपून आरोग्य यंत्रणेस बळकटी देण्याचे काम केले आहे.कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर, को.म.न.पा. आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, अधिष्ठाता डॉ.सौ.आरती घोरपडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बी.सी.केम्पीपाटील, डॉ.अजित लोकरे, अभ्यागत समिती सदस्य सुनील करंबे, शशिकांत रावळ- वाघमारे, महेंद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply