
इचलकरंजी : शिकण्याची दुर्दम्य इच्छा असेल तर असेल तर वयाची आठकाठी येत नाही. याचाच दाखला वयाच्या साठीतही दहावी उत्तीर्ण होवून त्यांनी दाखवून दिला आहे. प्रभुदास बजरंग लोले यांनी आज दहावीची परीक्षा देऊन ६७ टक्के गुणांसह यश मिळवून दाखवून दिले आहे.प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना सातवीनंतर शिक्षण घेता आले नव्हते. पुढे व्यवसायात स्थिरस्थावर होण्याकडे आणि मुलांना उच्च शिक्षण याकडे लक्ष दिल्याने ते शिक्षणापासून दूर होते. अलीकडे कुटुंबीयांनी आणि मित्रांनी त्यांना दहावी उत्तीर्ण होण्यासाठी प्रवृत्त केले. त्यानुसार ते इचलकरंजीतील पंचशील हायस्कूल येथे प्रवेश घेतला. त्यांना मुख्याध्यापक हेमंत धनवडे, बहिस्थ विद्यार्थी उपकेंद्र संचालक नरेंद्र कांबळे, कपिल धनवडे, आर. एन. कांबळे यांनी त्यांची तयारी करून घेतली. आज दहावीच्या परीक्षेत त्यांना ५०० पैकी ३३५ गुण मिळाले आहेत. माय मराठीत सर्वाधिक ७० गुण त्यांना प्राप्त झाले आहेत. ‘आर्या व शौर्या या नातींनी शिकण्याची प्रोत्साहन दिले. त्यामुळे कठीण मानली जाणारी हि परीक्षा उत्तीर्ण होवू शकलो’,असे लोले यांनी सांगितले
Leave a Reply