पतित पावन संघटनेच्या विनंतीवरून कपिलेश्वर हॉस्पिटल काेराेना उपचारासाठी उपलब्ध 

 

कोल्हापूर:कोरोनाविषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने खाजगी हॉस्पिटलच्या नेमणुका करत आहेत.मात्र तेही हॉस्पिटल कमी पडत असून रुग्णसंख्या वाढतच आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णालयांचा यामध्ये समावेश करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याअनुषंगाने पतित पावन संघटनेच्यावतीने दुधाळी येथील प्रसिद्ध असणारे कपिलेश्वर हॉस्पिटलचे डॉ.करपे व डॉ. बेलनेकर,डाॅं. पियुष अग्रवाल व स्टाफ यांना कोविडसाठी सेवा देणे बाबत विनंती करण्यात आली. त्या विनंतीला मान देऊन त्यांनीही कोव्हीड १९ साठी रुग्णालय चालू करण्यास सहमती दाखवली. त्या अनुषंगाने माननीय डाॅं. मल्लिनाथ कलशेट्टी आयुक्त काे.म.न.पा काेल्हापूर साहेब व स्थानिक नगरसेवक मा.प्रतापसिंह जाधव यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी लवकरात लवकर चालू करण्यासाठी सहकार्य करून दिले. तसेच परिसरातील नागरिकांनीही सहकार्याची भावना व्यक्त केली. आज राेजी हाॅस्पीटल काेराेना रुग्णांसाठी चालू करण्यात आले असून
कपिलेश्वर हॉस्पिटलमध्ये शासकीय नियमानूसार दर आकारून सेवा दिली जाईल असे रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आले.यावेळी संदीप चव्हाण,डाॅ बेलनेकर डाॅ संताेष पाटील,डाॅ करपे,डाॅ राजेश पाटील,डाॅ.केवडे पतित पावन संघटना जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील,विशाल पाटील सेवाव्रत प्रतीष्ठाण बंडा साळुंखे,अंबाबाई भक्त समीती अध्यक्ष महेश उरसाल,अवजड वाहतूक शिवसेना जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील , रणजीत आयरेकर,वंदेमातराम आॅर्गनायजेशन अवधूत भाट्ये ,नितेष काेकीतकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!