सात दिवसांच्या आत फाईल निर्गत करा :आम. चंद्रकांत जाधव 

 

कोल्हापूर :सात दिवसांच्या आत फाईलची निर्गत करा, अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज केली.महापालिकेच्या राजारामपुरी येथील नगररचना विभागाला नागरिकांच्या तक्रारीनुसार भेट देऊन आमदार जाधव यांनी आढावा घेतला. त्यावेळी ही सूचना केली.घरकुल आवास योजनेसाठी किती लोकांनी अर्ज केले आहेत याची माहिती घेऊन श्री. जाधव यांनी घरकुल आवासमधून नागरिकांना घरे उपलब्ध करून द्या, असे सांगितले. त्याचबरोबर बांधकामाची फाईल ज्यावेळी नागरिक सादर करतील त्यावेळी त्यांना फाईलमध्ये जरुरी असणाऱ्या कागदपत्रांची माहिती देऊन ती कागदपत्रे पूर्ण करून घ्या. फाईल लवकरात लवकर पूर्ण करून त्यांना बांधकामाचे आदेश द्या. महिन्यातून एक दिवस कॅम्प घेऊन पेंडिंग फाईल, बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र, झिपॉझिट परत मागणी, अशा स्वरूपाची कामे पूर्ण करून नागरिकांचे कार्यालयात चकरा मारणे थांबवा, अशी सूचना आमदार जाधव यांनी केली. कार्यालयातील कामाच्या दिरंगाईने महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी वेळेत कामाची पूर्तता करून महापालिकेचे नुकसान टाळावे.कार्यालयात पूर्ण क्षमतेने कर्मचारी उपलब्ध करण्याची सूचना आमदार जाधव यांनी आयुक्तांना केली.यावेळी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, नगररचना सहायक संचालक प्रसाद गायकवाड, उपरचनाकार एन. एस. पाटील, सर्व कनिष्ठ अभियंता बैठकीला उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!