क्षयरोगावरील उपचार असलेल्या प्रिटोमॅनिडसाठी मायलनला डीसीजीआयची मान्यता

 

मायलन या जागतिक फार्मास्युटिकल कंपनीने आज जाहिर केली की भारतीय औषध महानियंत्रक (डीसीजीआय)ने राष्ट्रीय क्षय रोग निर्मूलन कार्यक्रम (एनटीईपी) कार्यक्रमांतर्गत क्षयविरोधी औषध प्रीटोमॅनिडला सशर्त प्रवेशासाठी मान्यता दिली असून या उत्पादनास नियामक मान्यता देणारा भारत जगातील दुसरा देश ठरला आहे. प्रीटोमॅनिडला तीन-औषधांचा भाग, सहा महिन्यांच्या सर्व मौखिक उपचार (विशिष्ट परिस्थितीत उपचार नऊ महिने वाढविण्याच्या पर्यायासह) म्हणून मंजूर केले गेले आहे ज्यात बेडअक्विलीन, प्रीटोमॅनिड आणि लाइनझोलिड यांचा समावेश आहे, ज्यास एकत्रितपणे “बीपीएएल” म्हणून ओळखला जाते व ते पल्मोनरी एक्सटेन्सिव्हली ड्रग रेझिस्टंट टीबी (एक्सडीआर-टीबी), उपचार असहिष्णु किंवा गैर-प्रतिक्रिया देणारा मल्टीड्रॅग-रेझिस्टंट टीबी (एमडीआर-टीबी) असलेल्या प्रौढ रूग्णांच्या उपचारासाठी वापरले जाते.डीसीजीआय कडून सशर्त प्रवेश मंजूर करून मायलन प्रारंभी, देशभरात विनामूल्य, उच्च प्रतीची क्षयरोगविरोधी औषधे आणि सेवा पुरवणार्‍या व ज्या रुग्णांना सर्वात जास्त आवश्यक आहे त्यांच्यासाठी उपचार उपलब्ध आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी असलेल्या सरकारच्या राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमास (एनटीईपी) देणगीद्वारे ४०० उपचार कोर्स देशामध्ये उपलब्ध करुन देईल. कंपनी एनटीईपीला यापूर्वी जाहीर केलेल्या “जागतिक उपलब्धता किंमत” (ग्लोबल अ‍ॅक्सेक प्राईस) युएस $३६४ वर सहा महिन्यांच्या उपचारांच्या कोर्ससाठी व्यावसायिक उपलब्धता देईल तसेच देशांतर्गत आणि जागतिक पुरवठ्यासाठी स्वतःचे प्रिटोमॅनिड उत्पादन भारतात तयार करेल.मायलनचे अध्यक्ष राजीव मलिक म्हणाले, “मायलन जगातील अग्रगण्य संसर्गजन्य रोगांचे औषधप्रकार उपलब्ध करुन देते आणि भारतात प्रीटोमॅनिडला मिळालेली मंजूरी, पुढे क्षयरोगाच्या उपचारांचे चित्र अधिक उपलब्धता आणि किफायतशीरपणा या माध्यमातून रूपांतरित करण्याच्या आमच्या जागतिक वचनबद्धतेस समर्थन देते. त्याप्रमाणेच हे अभिनव भागीदारीचे सामर्थ्य देखील दर्शविते जशी रुग्णांसाठी नवीन औषध उपलब्धता विस्तारित करण्यात आमची टीबी अलायन्ससोबत अभिमानास्पद भागीदारी आहे. आजपर्यंत, मायलन आणि टीबी अलायन्सने दोन देशांमध्ये प्रीटोमॅनिडसाठी मंजुरी मिळविली आहेत. महत्वाचे म्हणजे, कोविड-१९ (साथीचा रोग) सर्व देशभर साथ वाढत असतानाही डीसीजीआयने क्षयरोगाच्या उपचारांवर सतत लक्ष केंद्रित केल्याबद्दल आभार, त्यामुळे आम्हाला भारतात विक्रमी वेळेत मंजुरी मिळाली. जगभरात जास्त भार असलेल्या देशांमध्ये, सर्वात जास्त गरज असलेल्यांसाठी उपचाराची उपलब्धता सुनिश्चित करण्यास आम्ही आपला प्रवास सुरू ठेवण्याची अपेक्षा करतो.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!