
कोल्हापूर :प्रसारमाध्यमांची शिखर संस्था असणाऱ्या कोल्हापूर प्रेस क्लबच्या सदस्यांना प्रतिकारशक्ती वाढवणारे ‘फिली’ या आयुर्वेदिक औषधांचे वाटप करण्यात आले. विविध बारा औषधी वनस्पतीपासून बनवलेले शक्तीवर्धक, एलर्जी विरोधी गुणधर्म असणाऱ्या तसेच श्वसन संस्थेशी निगडित आजार कमी करणाऱ्या व फुफ्फुसांची ताकद वाढविणाऱ्या या फिली सिरपमुळे कोरोनाच्या वाढत्या प्रसारातही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वृत्तांकन करणाऱ्या प्रसारमाध्यमातील पत्रकारांना रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करेल असे आयुर्झोन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे डॉ. प्रद्युन्म देशपांडे यांनी सांगितले. कोल्हापूर प्रेस क्लबच्या दालनात जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन मेस्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत या औषधांचे वाटप करण्यात आले. यावेळी सतेज औंधकर, शुभांगी तावरे, श्रद्धा जोगळेकर, अमर पाटील, भुषण पाटील, सागर चौगुले,नाज ट्रेनर,नासिर अत्तार,एम.वाय. बारस्कर, संदीप पाटील, आदी उपस्थित होते.
Leave a Reply