
कोल्हापूर : शहरात सध्या वेगाने फैलावत असलेल्या कोरोना साथीचे पार्श्वभूमीवर शहरातील नागरीकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने कोल्हापूरातील आजरेकर फौंडेशन, जगदाळे डिजिमिडीया एंटरटेंमेंट प्रा.लि. व युनिव्हर्सल प्रॉडक्शन यांच्यावतीने जनजागृतीपर व्हिडीओ डॉक्युमेंट्री तयार करण्यात आली आहे. या डॉक्युमेंट्रीमध्ये जनजागृतीपर संदेशाबरोबरच जिल्हयाचे पालकमंत्री, महापालिकेचे महापौर, आयुक्त व जिल्हा पोलिस प्रमुख यांचे संदेशांचाही समावेश असून सदरची व्हिडीओ डॉक्युमेंट्री सोशल मिडीया, न्युज चॅनेल्स इत्यादी माध्यमांव्दारे प्रसारीत करून शहरातील नागरीकांमध्ये कोरोनाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. आज या डॉक्युमेंट्रीचे प्रसारणाचा शुभारंभ कोल्हापूर महानगरपालिका येथे महापौर निलोफर आजरेकर, उप महापौर संजय मोहिते, काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, नगरसेवक अर्जुन माने, अतिरीक्त आयुक्त नितीन देसाई आजरेकर फौंडेशनचे अश्फाक आजरेकर, जगदाळे डिजिमिडीयाचे रोहित जगदाळे व युनिव्हर्सल प्रॉडक्शनचे अजीज मिरजकर* यांच्या उपस्थितीत पार पडला. हि डॉक्युमेंट्री तयार करण्यासाठी शारंगधर देशमुख व मा. अश्फाक आजरेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
Leave a Reply