स्टार प्रवाहवर १७ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतून सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर भेटीला येणार आहेत. जवळपास १० वर्षांपूर्वी स्टार प्रवाहच्याच मन उधाण वाऱ्याचे या मालिकेत त्या भेटीला आल्या होत्या. स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत त्या नंदिनी ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत. वर्षाजींना आतापर्यंत आपण ग्लॅमरस रुपात पाहिलं आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतला त्यांचा घरंदाज सासुचा अंदाज नक्कीच वेगळा ठरणार आहे.PROMO: https://www.facebook.com/447970815249907/posts/3306866252693668/
या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना त्या म्हणाल्या, १० वर्षांनंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाह आणि कोठारे व्हिजन्सची मालिका करताना आनंद होतोय. मालिकेमुळे आपण घराघरात पोहोचतो. प्रेक्षकांच्या जगण्याचा भाग होतो. त्यामुळेच मालिका करताना मला नेहमीच आनंद होतो. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतली ही भूमिका नक्कीच वेगळी आहे. नंदिनी गृहोद्योग समुहाची ती प्रमुख आहे. यासोबतच कोल्हापुरातल्या शिर्के पाटील या नामांकित कुटुंबाचं ती प्रतिनिधीत्व करते. नंदिनी हे पात्र प्रेक्षकांना आवडेल याची खात्री आहे. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ १७ ऑगस्टपासून रात्री ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
Leave a Reply