नेटसर्फ नेटवर्कच्या बायोफिटचा 1.2 कोटी उत्पादनांच्या विक्रीचा टप्पा 

 

कोल्हापूर : संपूर्ण जग जरी साथीच्या रोगामुळे होत असलेल्या दुष्परिणामांपासून मुक्त होण्यासाठी व्यस्त असले तरी आपल्या देशातील एक आवश्यक क्षेत्र म्हणजे शेती. त्याकडे सध्या लक्ष देणे हेही अत्यंत आवश्यक आहे. भारत ही मूलत: कृषीवर आधारित अर्थव्यवस्था आहे जी गेल्या काही काळापासून अनेक आव्हानांना सामोरे जात आहे. या अनुषंगाने, नेटसर्फ नेटवर्क या भारतातील डायरेक्ट सेलिंग करणार्‍या अग्रगण्य कंपनीने 2000 साली ‘बायोफिट’ या नावाने सैंद्रीय कृषी उत्पादने बाजारात आणली आणि अल्पावधीतच सेंद्रिय शेती उत्पादनांसह हा व्यवसाय महाराष्ट्रभर पसरला. आज नेट्सर्फचे भारतातील 29 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशांच्या निमशहरी आणि ग्रामीण भागात एक अतुलनीय नेटवर्क आहे.

बायोफिटची शेती आणि गुरांसाठी सेंद्रिय उत्पादने आहेत. इतर बऱ्याच उत्पादनांमध्ये स्टीम रिच (प्लांट ग्रोथ प्रमोटर), शेत (मृदा आरोग्य संवर्धन तंत्रज्ञान), इंटॅक्ट (सेंद्रिय कीटकनाशक), बायो 95 (एमल्सिफायर) आणि रॅप अप (सेंद्रिय कीटकनाशक) ही सर्वाधिक विकली जाणारी उत्पादने आहेत. नेटसर्फ नेटवर्कद्वारे सादर केलेली ही उत्पादने ECOCERT INDIA द्वारे मंजूर झालेली असूनही उत्पादनांची खरोखर एक समग्र श्रेणी आहे. हे शेतीत नफा वाढविण्यातपिकांची गुणवत्ता तसेच प्रमाणात वाढ करण्यात आणि कीटक व इतर रोगांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. हे पशुधनाचे आरोग्य सुधारणाकरिता काही नैसर्गिक उत्पादने देखील प्रदान करते. आत्तापर्यंतकंपनीने सुमारे 1 दशलक्ष शेतकर्‍यांना उत्पन्नातील वाढीचा लाभ मिळवून दिला आहे आणि १.२ कोटींहून अधिक बायोफिट उत्पादने भारतभर विकली आहेत.

आज, नेटसर्फ नेटवर्कचा 50% व्यवसाय देशाच्या ग्रामीण भागातून आपल्या सेंद्रिय शेती उत्पादनांद्वारे होत आहे. कंपनी केवळ शेतीविषयक उत्पादनेच नाही तर व्यवसायाची संधी देखील देते जेणेकरून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना उत्पन्न मिळू शकेल.

बायोफिटच्या उत्पादनाच्या श्रेणी करिता ग्रामीण भागातही त्यांचा ग्राहक वर्ग तयार असल्यामुळेनेटसर्फ नेटवर्क ग्रामीण भागातल्या कामगारांना कुठेही स्थलांतराशिवाय डायरेक्ट सेलर्स म्हणून बायोफिट उत्पादनांची विक्री करून नेटसर्फच्या व्यवसायात सामील होण्याची व रोजीरोटीसाठी उत्पन्न मिळवून देण्याची संधी देते. त्याचप्रमाणेभविष्यात डायरेक्ट सेलिंगच्या व्यवसायाच्या मदतीने शहरांमधील लोकसंख्येचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकेल. बहुतेक शेतकर्‍यांच्या घरात किंवा शेतात जनावरे असतात. त्यांचे दूधलोकर किंवा अंडी इत्यादीतून त्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते. नेटसर्फच्या पशु-आरोग्य उत्पादनांमध्ये उदा. सीएफसीसीएफसी प्लस आणि पेट लोशन हे बायोफिटच्या कृषी उत्पादनांचे उत्तम प्रकारे पूरक आहेत आणि त्यांच्यामुळे शेतकरी डायरेक्त्त सेलर्सना उत्पन्नासाठी आणखी एक मार्ग उपलब्ध होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!