
सोनी सब लवकरच नवीन मालिका ‘तेरा यार हूं मैं‘ सादर करणार आहे. ही मालिका आधुनिक काळातील वडिल व मुलाच्या नात्याला आणि मुलाचा मित्र बनण्याचा प्रयत्न करणा-या वडिलांच्या प्रयत्नांना दाखवते. या अद्वितीय व नवीन संकल्पनेला घराघरापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने सोनी सबने मालिकेच्या प्रसिद्धीसाठी बॉलिवुड सुपरस्टार वरूण धवनची निवड केली आहे. तो त्याच्या स्वत:च्या वडिलांसोबत असलेल्या नात्याच्या उबदार व प्रेमळ आठवणींना उजाळा देत वडिल-मुलाच्या नात्यामधील बारकाव्यांना सादर करणार आहे.मालिकेच्या संकल्पनेला सादर करण्यासाठी साठ सेकंदाच्या हृदयस्पर्शी व्हिडिओमध्ये वरूण आज जे कोणी आहे, त्यासाठी मित्र, मार्गदर्शक, आत्मविश्वासू व्यक्तीप्रमाणे मदत केलेल्या वडिलांसोबतच्या विविध आठवणींना उजाळा देतो. वरूण ”दोस्ती के फर्ज में, वो मेरे बाप निकले’ म्हणत त्याच्या वडिलांच्या प्रेमळ बाजूला सुरेखरित्या सादर करतो. वरूण त्याच्या वडिलांसाठी व्यक्त करत असलेल्या कृतज्ञता, मैत्री आणि अफाट प्रेमाच्या भावनेमधून ‘तेरा यार हूं मैं‘ची संकल्पना दिसून येते. ज्यामुळे तो या मालिकेसाठी अॅम्बेसेडर म्हणून योग्य निवड असल्याचे सिद्ध होते.प्रेक्षकांना या उत्साहपूर्ण व्हिडिओमध्ये एक मुलगा त्याच्या जीवनातील प्रेमळ आठवणींना उजाळा देताना पाहायला मिळणार आहे, जेथे त्याच्या वडिलांनी त्याला उपकार म्हणून नव्हे तर चुका करण्यास प्रोत्साहित करणा-या मित्राप्रमाणे पाठिंबा दिला आहे. ज्यामुळे त्याला त्याच्या चुकांमधून शिकता येईल. तसेच वडिल त्याच्या स्वप्नांना पूर्ण करण्याची दिशा दाखवणारे मार्गदर्शक म्हणून देखील भूमिका पार पाडतात.
Leave a Reply