
कोल्हापूर: संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात सध्या करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील कै.अनंतराव गोविंदराव कोरगावकर ट्रस्टच्यावतीने कोरगावकर पेट्रोल पंप येथे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अर्सेनीक अल्बम या औषधाचे मोफत वाटप करण्यात आले. सुमारे २५००हुन अधिक लोकांना आणि पेट्रोल पंपावार काम करणाऱ्या कर्मचा-यांना हे औषध वाटप करण्यात आले.तसेच यावेळी पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी येणाऱ्या येणा-या ग्राहकांची आणि कर्मचा-यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.कोरगावकर ट्रस्ट हे नेहमीच सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक उपक्रम राबवित असतात. तसेच आपल्या संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांही काळजी घेत असतात.
यावेळी कोरगावकर ट्रस्टचे अध्यक्ष अमोल कोरगावकर, आशिष कोरगावकर, आकाश कोरगावकर, अनिकेत कोरगावकर,राज कोरगाकर उपस्थित होते.
Leave a Reply