
कोल्हापूर: येथील पृथ्वीराज जगताप युवा मंचतर्फे छायाचित्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ छायाचित्रकार रघू जाधव यांचा सत्कार पृथ्वीराज जगताप यांचे हस्ते करण्यात आला.छायाचित्रकार रघू जाधव यांनी आपल्या सुरवातीच्या काळापासूनचा प्रवास उलगडून सांगितला.त्याना लोकजीवनाचे छायाचित्रन ह्यात विशेष आवड आहे. व्यवसायातून पैसा मिळविण्यापेक्षा आवड आणि समाधान म्हणून छायाचित्रन व्यवसायाकडे पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. रघू जाधव यांनी छायाचित्रन निर्मिती पासून आजपर्यंतचा इतिहास समजावून सांगितला.तसेच त्यांनी सध्याच्या पिढीने देखील पूर्ण अभ्यास करून या क्षेत्रात आपण पाऊल ठेवावं असं हे सांगितलं तसेच ते नामवंत विद्यालय विवेकानंद कॉलेज तसेच संजय घोडावत या सारख्या मोठ्या शाळेमध्ये जाऊन ते आपापले सेमिनार देखील करत असतात त्यांच्या सत्कारादरम्यान त्यांना सॅनिटायझर व मास्क देखील देण्यात आले जेणेकरून त्यांनी त्यांच्या प्रकृती ची काळजी घ्यावी व त्यांना डिजिटल फोटोग्राफी हे पुस्तक ही देण्यात आले.
यावेळी : पृथ्वीराज जगताप ,डाॅ. गुरुदत्त म्हाडगुत ,पुरुषोत्तम पाटील यासह मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply