
कोल्हापूर:अहमदनगर येथील तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड मयुरेश पाटील यांनी तयार केलेले व सध्या कागल तालुक्यात कार्यान्वित असलेले “ऑनलाईन शाळा” हे सॉफ्टवेअर संपूर्ण महाराष्ट्रभर लागू करण्याचा विचार असल्याचे प्रतिपादन, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. सुरुवातीला अहमदनगर व कोल्हापूर जिल्ह्यात पायलट प्रोजेक्ट म्हणून हे ॲप तात्काळ वापरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या राज्यात हे एकमेव कागल तालुक्यात वापरले जात आहे.हे ऍप संपूर्ण राज्यभर लागू करण्याच्या विचाराने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंत्रालयात एक व्यापक बैठक आयोजित केली होती. तीमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह ग्रामविकास खात्याचे मुख्य सचिव अरविंदकुमार, कागलचे गट शिक्षणाधिकारी डॉ. जी. बी. कमळकर, तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड, मयुरेश पाटील, महादेव गुरव, रमेश कदम, विशेष कार्य अधिकारी रवींद्र पाटील, कक्ष अधिकारी श्री भांडारकर आदी उपस्थित होते. यावेळी प्रोजेक्टरद्वारे प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.मंत्री मुश्रीफ यांनी, कोरोना महामारी संपल्यानंतरसुद्धा हे ॲप कायमस्वरूपी कसे उपयोगी पडेल, उजळणी कशी घेता येईल व इतर अनुषंगिक बाबींची सविस्तर माहिती घेतली.यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी तात्काळ कोल्हापूर व अहमदनगर या दोन्ही जिल्ह्याची मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी व संबंधित अधिकार्यांची एकत्रित बैठक घेऊन हे ॲप कार्यान्वित करण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या.कागलचे गट शिक्षणाधिकारी डॉ. जी. बी. कमळकर म्हणाले, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रेरणेतून महाराष्ट्रात सर्वप्रथम आणि एकमेव हे ॲप कागल तालुक्यात सुरू केले आहे . या सॉफ्टवेअरला कागल तालुक्यातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळून चांगला शैक्षणिक उठाव होत आहे .चौकट :शाळा बंद पण शिक्षण चालू……
“शाळा बंद पण शिक्षण चालू”….. हे ब्रीद घेऊन संदीप गुंड आणि मयुरेश पाटील यांनी हे ॲप तयार केले आहे.
यामध्ये विद्यार्थी अभ्यास करतो की नाही, याचा फीडबॅक घेता येतो. कोणत्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहिला, याची सदर यादी आपल्याला पाहायला मिळते. तसेच ऑनलाइन परीक्षासुद्धा घेता येते. याचा संपूर्ण डाटा गटशिक्षणाधिकारी लाँगिनला मिळतो. त्यामुळे प्रशासनाला सुद्धा याची मदत होते.
मुंबई- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मंत्रालयातील दालनात ऑनलाइन शाळा हे ॲप राज्यभर लागू करण्याविषयीच्या बैठकीत मंत्री श्री मुश्रीफ. यावेळी ग्रामविकास विभागाचे मुख्य सचिव अरविंद कुमार, कागलचे गटशिक्षणाधिकारी डॉ. जी. बी. कमळकर, तंत्रस्नेही शिक्षक व ॲपचे निर्माते संदीप गुंड व मयुरेश पाटील, महादेव गुरव, रमेश कदम इत्यादी
Leave a Reply