
तूफान लोकप्रिय ठरलेल्या ” तुझ्यात जीव रंगला” या मराठी टीव्ही मालिकेतील ” दौलत” या हार्दिक जोशी अर्थात राणा च्या वाड्याचा सेट याच मालिकेतील बरकत या राणा च्या मित्राची भूमिका साकारणाऱ्या अमोल नाईक या कलाकाराने आपल्या घरातील गणपतीची सजावट करताना साकारला आहे . ही सजावट पाहण्यासाठी गर्दी होत आहे .अमोलच्या या कल्पकतेचे कौतुक होत आहे .सोशल मिडियावर देखील हा देखावा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे .राणा अर्थात हार्दिक जोशीचा रहिवास असणाऱ्या ” दौलत” या वाड्याची हुबेहुब प्रतिकृती अमोल नाईक याने त्याच्या कोल्हापुरातील कसबा बावडा येथील घरगुती गणपतीची सजावट करताना साकारली आहे .या वाड्याच्या चौकातच अमोलच्या घरातील गणेशमूर्ती प्रतिष्ठापित केल्याचा देखावा अमोलने यातून साकारला आहे ..भव्य चौसोपी वाडा, वाड्याच्या दारातील खिल्लारी बैलांची जोड़ी , दारातील तुळशी वृंदावन,,, अशी नेमकी वातावरण निर्मिती करण्यात अमोल नाईक यशस्वी ठरला आहे .या कल्पक देखाव्याचे तुझ्यात जीव रंगला मालिकेतील कलाकार ,तंत्रद्य ,यांच्याकडून स्वागत होत आहे .
Leave a Reply