
कोल्हापूर :कोणत्याही परिस्थितीत आंबेओहळ व नागणवाडी प्रकल्पात येत्या पावसाळ्यात पाणी अडविणारच असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. या दोन्ही प्रकल्पांची कामे पावसाळ्यानंतर ऑक्टोबरपासून सुरू होऊन उन्हाळ्यात घळभरणी पूर्ण होईल असेही श्री. मुश्रीफ म्हणाले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात या दोन्ही प्रकल्पांच्या संदर्भात आढावा बैठक आयोजित केली होती, या बैठकीत श्री. मुश्रीफ यांनी हा निर्धार व्यक्त केला.यापूर्वी झालेल्या आढावा बैठकीत हे काम जर येत्या वर्षात पूर्ण झाले नाही, तर जबाबदार संबंधित अधिकाऱ्यांना निवृत्तीवेतन सुद्धा मिळू देणार नाही तसेच कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट मध्ये टाकू असा इशारा त्यांनी दिला होता. आज या इशा-याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.यावेळी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, प्रांताधिकारी रामहरी भोसले, प्रांताधिकारी श्रीमती विजया पांगारकर, निवासी उपजिल्हाधिकारी कवितके, पुनर्वसन अधिकारी सौ. कुलकर्णी आदी अधिकारी उपस्थित होते.आंबे ओहळ प्रकल्पांतर्गत एकूण प्रकल्पग्रस्त 822 आहेत. त्यापैकी स्वेच्छा निवाडा घेतलेले प्रकल्पग्रस्त 355 आहेत. दरम्यान 467 प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात पात्र आहेत. त्यापैकी 320 जणांचे पुनर्वसन पूर्ण झाले आहे. पंधरा लोकांचे पुनर्वसनाचे प्रस्ताव आले आहेत. त्यानंतर पुनर्वसनाचे काम 72 टक्के पूर्ण होईल. आलेल्या सात कोटी पैकी 43 कोटींचे वाटप झाले आहे.
दरम्यान नागणवाडी प्रकल्पात एकूण 330 खातेदार आहेत. त्यापैकी 98 जणांनी स्वेच्छा पुनर्वसन घेतलेले असून 34 प्रकल्पग्रस्तांनी जमिनी ताब्यात घेतल्या आहेत. तर 28 जणांच्या वाटपाला स्थगिती आहे. 87 पुनर्वसनग्रस्तांना आर्थिक पॅकेजचे वाटप केले आहे. तसेच 12 प्रस्ताव सादर केले आहेत. या प्रकल्प पुनर्वसनाचे काम 78 टक्के पूर्ण झाले आहे.
Leave a Reply