
मुंबई : आधी वंदू तुझ मोरया ! चौदा विद्या,चौसष्ठ कलांचा अधिपती आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणार्या आपल्या गणपती बाप्पाचे आगमन यावर्षी देखील घरोघरी उत्साहात करण्यात आले … पण,परंपरागत गणेशोत्सवाचं चित्र काहीसं पालटलेलं जाणवलं… विघ्नहर्त्याच्या आगमनाने बर्याच काळापासून असलेले कोरोनाचे सावट आणि नकारात्मक वातावरण काहीसं दूर राहून सर्वत्र आनंददायी माहोल पाहायला मिळत आहे… या काळात प्रत्येक व्यक्ति हेच साकड घालत आहे की, सगळ्या चिंता दूर होवो आणि आपल्यावर ओढवलेले हे संकट बाप्पा दूर करो… याच पार्श्वभूमीवर कलर्स मराठी घेऊन येत आहे ‘बाप्पा मोरया रे’ हा विशेष सोहळा… या विशेष कार्यक्रमामधून विविध कलाकार गणरायाच्या या विश्वरूपी प्रतिमेला अभिवादन करणार आहेत. आणि याचाच श्री गणेशा कलर्स मराठी परिवारातील आपल्या लाडक्या कलाकारांनी अष्टविनायकाला साकडं घालून केला आहे… हा विशेष परफॉर्मन्स मृणाल दुसानीस, शशांक केतकर, अशोक फळदेसाई, विदुला चौघुले, मनिराज पवार, शिवानी सोनार, सुमित पुसावळे, ऐश्वर्या नारकर, रेवती लेले, अमोल बावडेकर सादर करणार आहेत. असेच भक्तीचे विविध रंग घेऊन तुमच्या भेटीला ‘बाप्पा मोरया रे’ हा विशेष सोहळा घेऊन आलो आहे… कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या सगळ्यांच्या लाडक्या स्पृहा जोशीने केले आहे…तेंव्हा नक्की बघा ‘बाप्पा मोरया रे’ ३० ऑगस्ट संध्या ७.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर…
Leave a Reply