
कोल्हापूर : कोल्हापूरचे प्रश्न आणि कोल्हापूरसाठी राज्यसरकार नेहमीच कटीबद्ध आहे.विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर टोलमुक्त करण्याचे वचन दिले होते. ते पूर्ण केले.सत्कार्य केल्याशिवाय सत्कार स्विकारणार नाही असे तत्व आहे. टोलमुक्त कोल्हापूर हा विजय कोल्हापूरच्या जनतेचा आहे.माझ्या मंत्रीमंडळात एकनाथ शिंदे.चंद्रकांतदादा पाटील यांच्यासारखे सामर्थ्यवान मंत्री आहेतजे फक्त जनतेचाच विचार करतात. म्हणूनच चांगले निर्णय घेणे शक्य होते.उच्च न्यायालयानेही आयआरबी ची याचिका फेटाळली कारण त्यांच्या कागदावर दाखविलेल्या आणि त्यांना प्रत्यक्ष मिळणाऱ्या पैशात खूप तफावत होती.राज्यातील उर्वरित टोल नाक्यांवर इलेक्ट्रॉनिक यंत्रणा राज्य सरकार बसविणार आहे.जेणेकरून जनतेची टोलमुळे पिळवणूक होणार नाही.आवश्यक टोल घेतला जाईल.कोल्हापूरला भेडसावत असणाऱ्या अनेक प्रश्नात पंचगंगा प्रदूषण प्रश्नी महापालिकेने आरखडा तयार करावा,सांडपाण्यावर प्रक्रिया करावी,मार्चपूर्वी २५० कोटींचा तीर्थक्षेत्र आरखडा मंजूर करण्यात येईल,नवीन सर न्यायधीश यांच्यासमोर खंडपिठाची मागणी पुन्हा राज्य सरकार करेल.यासाठी ११०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद झाली आहे,टोल आंदोलनात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ते परत घेतले जातील असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.
टोल मुक्ती चे खरे शिल्पकार कोल्हापुरची जनता आहे.हे जनतेचे व लोकांचे राज्य आहे. शिव सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शब्द दिला यावर पहिल्य पासून मुख्यमंत्री सकारात्मक राहिले जनतेच्या भावना लक्ष्यात घेऊन टोल रद्द केला असे एम एस आर डी सी मंत्री आमदार एकनाथ शिंदे यांनी भाषणात सांगितले.
छ. शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांनी जनतेच्या मनातील ओळखून जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या फडणवीस सरकार यांच्याच पावलावर पाऊल टाकत आहे.असे पालक मंत्री चंद्रकांतदादा म्हणाले.चार चाकी वाल्यांसाठी पायात चप्पल नसलेली माणसे यांनी रस्त्यावर येऊन लढा दिला.असे प्रा. डॉ. एन.डी. पाटील म्हणाले.यावेळी खासदार राजू शेट्टी, शाहू महाराज छात्रपती, आमदार राजेश क्षीरसागर,आमदार चंद्रदीप नरके,सुरेश हलवणकर , अमल महाडिक यांच्यासह निमंत्रक निवास साळोखे यांनी मनोगते व्यक्त केली. सर्व भाजप कार्यकर्ते,टोल विरोधी कृती समितीचे बाबा पार्टे,आ.सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, प्रकाश अबिटकर ययांच्यासह नागरिक उपस्थित होते.
Leave a Reply